मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमाला (IPL 2022)  आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. या 15 व्या हंगामाला  26 मार्चपासून सुरुवात होतेय. या मोसमापासून एकूण 10 संघ आमनेसामने भिडणार आहेत. या हंगामाआधी मेगा ऑक्शन (IPL Mega Aucion 2022) पार पडलं. या मेा ऑक्शनमध्ये अनेक खेळाडू मालामाल झाले.मात्र अनेक खेळाडू हे अनसोल्ड राहिले. तसेच काही खेळाडूंना दुखापतीमुळे या मोसमाला  मुकावं लागलं. तर काहींनी वैयक्तिक कारणामुळे माघार घेतली. हीच दुखापत आणि माघार काही अनसोल्ड राहिलेल्या खेळाडूंच्या पथ्यावर पडली. त्यामुळे अनसोल्ड राहिलेल्या 3 खेळाडूंचं नशिब फळफळय. आता हे खेळाडू आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहेत. (ipl 2022 3 unsold player aaron finch rahmanullah gurbaz and muzarabani will play in thi 15 season)      


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एलेक्स हेलच्या जागी एरॉन फिंच 


केकेआरने मेगा ऑक्शनमध्ये एलेक्स हेल्सला (Alex Hales) आपल्या ताफ्यात घेतलं. मात्र एलेक्सने माघार घेतली. त्यामुळे आता केकेआरने इंग्लंडच्या एलेक्सच्या जागी ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार एरॉन फिंचला (Aaron Finch) संधी दिली आहे. फिंच मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड राहिला होता.


केकेआरने एरॉनला 1 कोटी 50 लाख रुपयांच्या बेस प्राईजमध्ये आपल्या ताफ्यात घेतलं. फिंचने आतापर्यंत 88 टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 2 शतक आणि 15 अर्धशतकांसह 2 हजार 686 धावा केल्या आहेत. तर आयपीएलमध्ये सामन्यात 14 अर्धशतकांसह 2 हजार 5 रन्स केल्या आहेत.  


जेसन रॉयच्या जागी रहमनुल्लाह गुरबाज


गुजरात टायटन्सने (Gujrat Titans) इंग्लंडच्या जेसन रॉयच्या (Jason Roy) जागी अफगाणिस्तानच्या रहमानुल्ला गुरबाजला (Rahmanullah Gurbaz) आपल्या गोटात घेतलं आहे.जेसनने बायोबबलच्या कटकटीमुळे माघार घेतली.


गुजरात टायटन्सने 50 लाख रुपये मोजून गुरबाजला आपल्यात सामिल करुन घेतलंय. गुरबाजची आयपीएलमध्ये खेळण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे.


गुरबाज अफगाणिस्तानकडून 20 टी 20 सामने खेळला आहे. या 20 सामन्यांमध्ये त्याने 3 अर्धशतकांच्या मदतीने 534 धावा कुटल्या आहेत. विशेष म्हणजे गुरबाज वनडे पदार्पणात शतक ठोकणारा पहिला अफगाणी बॅट्समन आहे.त्याने 2021 मध्ये अबूधाबीत आयर्लंड विरुद्ध हा कारनामा केला होता. 


मार्क वुडऐवजी ब्लेसिंग मुजरबानी 
 
लखनऊ सुपर जायंट्सने (Lucknow Super Giants) मेगा ऑक्शमध्ये इंग्लंडच्या मार्क वुडला (Mark Wood)  खरेदी केलं. मात्र वुडला दुखापतीमुळे या मोसमाला मुकावं लागलंय. त्यामुळे आता वुडच्या जागी झिम्बाब्वेच्या ब्लेसिंग मुजरबानीला संधी मिळू शकते.मुजरबानी भारताच्या दिशेने रवाना झाला आहे. मुजरबानी नेट बॉलर म्हणून संघात जोडला जाऊ शकतो.मात्र याबाबत अजूनही कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.