IPL 2021 : अहमदाबाद टीमच्या कर्णधारपदाची माळ कुणाच्या गळ्यात? 3 दिग्गज शर्यतीत
IPL 2021 : अहमदाबाद टीमच्या कर्णधारपदासाठी 3 दिग्गज दावेदार
दुबई: आयपीएलमध्ये 2022 मध्ये 10 टीम मैदानात उतरणार आहेत. अहमदाबा आणि लखनऊ या दोन टीम सहभागी होणार आहेत. या दोन्ही टीमसाठी कर्णधार निवडण्याची जोखीम आहे. आता हैदराबाद संघाच्या कर्णधारपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. या स्पर्धेत 3 दिग्गज खेळाडू शर्यतीमध्ये आहेत.
सीवीसी कॅपिटल 5166 कोटी रुपये देऊन अहमदाबाद टीमची मालकी मिळवली आहे. आता या टीमसाठी कर्णधार कोण असेल याची उत्सुकता सर्वांनाच आहे.तीन दिग्गज खेऴाडूंमध्ये सर्वाधिक चुरस आहे. त्यापैकी पहिलं नाव अर्थातच डेव्हिड वॉर्नर आहे.
डेव्हिड वॉर्नर
14 व्या हंगामातील झालेला वाद आणि एकूण डेव्हिड आणि SRH च्या टीमची कामगिरी पाहता डेव्हिड वॉर्नरला पुढच्यावेळी संघात संधी मिळणं कठीणच आहे. त्यामुळे वॉर्नर जाणार हे निश्चित आहे. कांगारू फलंदाजांनी तो लिलावासाठी आपलं नाव देणार असल्याचंही सांगितलं आहे.
अहमदाबाद संघ डेव्हिडकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्याचा विचार करू शकतो. वॉर्नरने आतापर्यंत आयपीएलमध्ये 41.59 च्या सरासरीने आणि सुमारे 140 च्या स्ट्राइक रेटने 5449 धावा केल्या आहेत. ज्यात 4 शतके आणि 50 अर्धशतकांचा समावेश आहे. आयपीएल 2021 मध्ये एसआरएच संघाची कामगिरी अत्यंत खराब होती, त्यामुळे वॉर्नरला त्याचा फटका सहन करावा लागला.
डेव्हिडला कर्णधारपदाचा अनुभव आहे. इतकच नाही तर वॉर्नर यंदाच्या हंगामात जरी चांगला खेळला नसला तरी एकूणच त्याची कामगिरी पाहता त्याच्याकडे ही जबाबदारी येण्याची शक्यता आहे.
एरोन फिंच
एरोन फिंच हा टी-20 फॉरमॅटमध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आहे. फिंचचा अनुभव पाहता अहमदाबाद फ्रँचायझीची त्याच्यावर नक्कीच नजर असेल. त्याच्या नेतृत्व कौशल्याचा संघाला फायदा होऊ शकतो.
के एल राहुल
के एल राहुल पुढील हंगामात दुसर्या संघात सामील होऊ शकतो. तो पंजाब किंग्ज सोडण्याचा विचार करत आहे. अशा परिस्थितीत अहमदाबाद फ्रँचायझी त्याचा विचार करू शकते.