मुंबई : आधी टीम इंडियामधून बाहेर बसवलं आणि आता आयपीएलमध्येही करिअर धोक्यात येण्याची शक्यता आहे. हा स्टार क्रिकेटपटू टीम इंडियामधून खराब फॉर्ममुळे बाहेर झाला. आता आयपीएल खेळण्याचं एकमेव सोर्स उरला असताना तेही दार बंद होणार का अशी शंक येऊ लागली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाचा स्टार खेळाडू अजिंक्य रहाणेला श्रीलंके विरुद्धच्या सीरिजमध्ये संधी दिली नाही. त्याच्या खराब कामगिरीचा फटका टीम इंडियाला वेळोवेळी बसला आहे. त्याची मैदानात बॅट चालत नाही. त्यामुळे निवड समितीही त्याच्यावर निराश आहे. 


कोलकाता संघाने रहाणेला मेगा ऑक्शनमध्ये आपल्या टीममध्ये घेतलं. पहिल्या सामन्यात त्याची सुरुवात तरी चांगली झाली असं म्हणेपर्यंत पहिले पाढे पंचावन्न अशी वेळ आली. अजिंक्य रहाणे दुसऱ्या सामन्यात फेल गेला. 


बंगळुरु विरुद्ध सामन्यात अजिंक्य रहाणेला कोलकाता टीमकडून जास्त धावा करण्यात यश आलं नाही. त्याने 10 चेंडूमध्ये फक्त 9 धावा केल्या आहेत. CSK विरुद्धही तो खूप जास्त धावा करू शकला नाही. त्यामुळे पुन्हा त्याला ओपनिंगची संधी दिली किती देतील याबाबतही शंका आहे. 


गेल्या हंगामातही रहाणे सतत फ्लॉप फॉर्ममध्ये होता. तो दिल्ली संघाकडून खेळत होता. 2020 मध्ये जमतेम 9 सामन्यांमध्ये त्याने 113 धावा केल्या. टीम इंडियाकडूनही त्याला जास्त धावा करता आल्या नाहीत. त्यामुळे आता त्याला संघात संधी दिली जात नाही.


रहाणेचा हाच फ्लॉप शो सुरू राहिला तर लवकरच कोलकाताच्या प्लेइंग इलेव्हनमधून तो बाहेर जाऊ शकतो. त्यामुळे आता त्याचं करिअर धोक्यात आलं आहे. आता रहाणेचं काय होणार कोलकाता फ्रान्चायझी काय निर्णय घेणार पाहावं लागणार आहे.