मुंबई : आयपीएलमध्ये अतिशय चुरशीची लढत सुरू आहे. प्लेऑफमध्ये गुजरातनं आपलं स्थान निश्चित केलं आहे. उर्वरित टीममध्ये अटीतटीचे सामने खेळवले जात आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये 2022 मध्ये काही खेळाडू खराब कामगिरी करताना दिसत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे खेळाडू सपशेल अपयशी ठरले आहेत. टीमला त्यांच्या खराब फॉर्मचा फटका बसला. त्यामुळे टीमवर सामना गमवण्याची वेळ आली आहे. अजिंक रहणेसोबत या स्टार खेळाडूंचा हा शेवटचा हंगाम असू शकतो अशी चर्चा आहे. 


1. कीरोन पोलार्ड 


आयपीएल 2022 मध्ये किरोन पोलार्ड हा सर्वात महत्त्वाचा मुंबईसाठी असलेला खेळाडू. मात्र यंदाच्या हंगामात तो सर्वात जास्त फ्लॉप ठरला आहे. त्याच्या बॅटमधून धावा निघताना दिसत नाही. 


आयपीएल 2022 च्या 9 सामन्यांमध्ये पोलार्डला केवळ 117 धावा आणि फक्त 3 विकेट घेता आल्या आहेत. पोलार्ड 2010 पासून मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे.0 त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली आहे. पोलार्डचा खराब फॉर्म लक्षात घेता मुंबई टीम त्याला आपल्या टीममध्ये घेईल याची शक्यता कमी आहे.


2. अजिंक्य रहाणे


खराब फॉर्ममुळे टीम इंडियातून बाहेर बसलेला अजिंक्य राहणे आयपीएलमध्ये विशेष कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे यंदा रहाणेचा शेवटचा आयपीएल असण्याची शक्यता आहे. त्याने 2022 मध्ये 5 सामने खेळून 80 धावा केल्या आहेत. 


अजिंक्य रहाणे खराब फॉर्ममध्ये खेळत असल्याचा तोटा टीमला झाला. त्यामुळे टीम इंडियापाठोपाठ अजिंक्य रहाणेला कोलकाता टीममधूनही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्यामुळे अजिंक्य रहाणेचं करिअर धोक्यात आलं आहे. 


3. विजय शंकर 


आयपीएलमध्ये विजय शंकरचा फ्लॉप गेम पाहायला मिळाला. टीम इंडियातून बाहेर असलेला हा खेळाडू आयपीएलमध्येही फ्लॉपच ठरला. गुजरात विरुद्ध पंजाब सामन्यात तो खास कामगिरी करू शकला नाही. टीमसाठी तो एक ओझ आणि समस्या बनला आहे. त्याच्या फ्लॉपशोचा टीमला मोठा फटका बसत आहे. त्यामुळे गुजरात टीम त्याला बेचवर बसवू शकते.