IPL 2022, Ravindra Jadeja | कॅप्टन झाल्यानंतर रवींद्र जाडेजाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला.....
धोनीनंतर रवींद्र जाडेजाला (Ravindra Jadeja) चेन्नईच्या कॅप्टन्सीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. जाडेजाने कॅप्टन झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) सलामीचा सामना कोलकाता विरुद्ध चेन्नई यांच्यात (KKR vs CSK) खेळवण्यात येणार आहे. मात्र त्याआधी चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) कॅप्टन्सी सोडली. धोनीने आपल्या नेतृत्वात चेन्नईला 4 वेळा विजेतेपद जिंकून दिलं. धोनीनंतर रवींद्र जाडेजाला (Ravindra Jadeja) चेन्नईच्या कॅप्टन्सीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. जाडेजाने कॅप्टन झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. जोवर धोनी आहे तोवर काही टेन्शन नाही, असं जाडेजाने म्हटलंय. (ipl 2022 csk chennai super kings ravindra jadeja first reaction after taking charges of captaincy)
जाडेजा काय म्हणाला?
"मला खूप चांगलं वाटतंय. मात्र यासोबतच एका मोठ्या खेळाडूची उणीव भरुन काढायची आहे, जे सोपं नसेल. माही भाईने चेन्नईसाठी निर्माण केलेला वारसा पुढे नेण्याची संधी मला मिळत आहे", अशी प्रतिक्रिया जाडेजाने दिली. चेन्नई फ्रँचायजीने जाडेजाचा एक व्हीडिओ शेअर केलाय. यामध्ये जाडेजाने ही प्रतिक्रिया दिली. धोनीने चेन्नईला 9 वेळा फायनलमध्ये तर 11 वेळा प्लेऑफमध्ये पोहचवलंय. तर 4 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली आहे.
"मी धोनीला विचारणार"
कॅप्टन झालो म्हणून मला चिंता करण्याची काही गरज नाही. धोनी आताही आमच्यासोबत आहे. मला जे काही प्रश्न पडतील मी त्याबाबत धोनीचा सल्ला घेईन. त्यामुळे मला चिंता करण्याती गरज नाही", अशी प्रतिक्रिया जाडेजाने दिली.
आयपीएलच्या 15 व्या मोसमासाठी चेन्नईची टीम (CSK Team 2022 Players List) :
रवींद्र जडेजा (कॅप्टन), महेंद्र सिंह धोनी, मोईन अली, ऋतुराज गायकवाड, ड्वेन ब्रावो, अंबाती रायडू, केएम आसिफ, तुषार देशपांडे, दीपक चाहर, शिवम दुबे, महेश दीक्षाना, राजवर्धन हंगरकेकर, सिमरजीत सिंह, डेवोन कॉनवे, ड्वेन प्रिटोरियस, मिशेल सेंटनर, एडम मिल्ने, सुभ्रांशु सेनापति, मुकेश चौधरी आणि प्रशांत सोलंकी.