मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमासाठी (IPL 2022) सर्व 10 संघांनी कंबर कसली आहे. प्रत्येक संघ ट्रॉफी मिळवण्याच्या दृष्टीने जोरदार सराव करत आहे. यंदाच्या हंगामातील साखळी फेरीतील सामन्यांचं आयोजन हे महाराष्ट्रात करण्यात आलंय. त्यात 2 नवे संघ जोडले गेल्याने क्रिकेटचा थरार आणखी रंगणार आहे. मोसमातील पहिला सामना हा 26 मार्चला चेन्नई आणि कोलकाता यांच्यात खेळवण्यात येणार आहे. याआधी चेन्नईसाठी आणि कॅप्टन महेंद्रसिंह धोनीसाठी (Mahednra Singh Dhoni ) मोठी बातमी समोर आली आहे. चेन्नई टीममध्ये स्टार बॅट्समनचं पुनरागमन झालंय. (ipl 2022 csk chennai super kings star opener ruturaj gaikwad join squad after injurey)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुखापतीतून सावरल्यानंतर आणि एनसीए (National Cricket Acedmy) फिटनेस टेस्ट पास झाल्यानंतर चेन्नईच्या गोटात ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad)  परतलाय. त्यामुळे टीमला आणि पर्यायाने कॅप्टन धोनीला मोठा दिलासा मिळाला आहे.  मराठमोळा ऋतुराज 14 व्या मोसमात ऑरेन्ज कॅप विनर राहिला होता. एका मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेन्ज कॅप दिली जाते.


ऋतुराजला वेस्टइंडिज विरुद्धच्या टी 20 मालिकेदरम्यान कोपऱ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे ऋतुराजला मालिकेतून बाहेर पडावं लागलं होतं.  ऋतुराजला या दुखापतीमुळे 15 व्या मोसमाला मुकावं लागणार का, अशी भिती व्यक्त केली जात होती. मात्र आता ऋतुराज सर्व औपचारिकता पूर्ण करुन चेन्नईच्या गोटात दाखल झालाय. त्यामुळे चेन्नईला मोठा दिलासा मिळाला आहे. 


ऑरेन्ज कॅप विनर 


चेन्नईने 14 व्या मोसमाचं विजेतेपद पटकावलं होतं. चेन्नईला ट्रॉफी मिळवून देण्यात ऋतुराजचा मोठा वाटा राहिला होता. त्याने 14 व्या मोसमात एकूण 14 सामन्यांमध्ये 1 शानदार शतकाच्या मदतीने 636 धावा केल्या होत्या. यासह ऋतुराज 14 व्या मोसमात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. यासाठी त्याला ऑरेन्ज कॅपने गौरवण्यात आलं होतं. यामुळे आता चेन्नई फ्रँचायजी आणि कॅप्टन धोनीला ऋतुराजकडून अशाच शानदार आणि वादळी-तुफानी खेळीची अपेक्षा असणार आहे.