IPL 2022, Ruturaj Gaikwad | मराठमोळ्या ऋतुराजची निराशाजनक सुरुवात
पहिल्याच सामन्यात चेन्नईच्या मराठमोळ्या आणि गेल्या मोसमात ऑरेन्ज कॅप विनर राहिलेल्या ऋतुराज गायकवाडची (Ruturaj Gaikwad) हंगामाची सुरुवात निराशानजक झाली आहे.
मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) सलामीच्या सामन्याला सुरुवात झालीये. पहिला सामना चेन्नई (Chennai Super Kings) विरुद्ध कोलकाता (Kolkata Knight Riders) यांच्यात खेळवण्यात येत आहे. या पहिल्याच सामन्यात चेन्नईच्या मराठमोळ्या आणि गेल्या मोसमात ऑरेन्ज कॅप विनर राहिलेल्या ऋतुराज गायकवाडची (Ruturaj Gaikwad) हंगामाची सुरुवात निराशानजक झाली आहे. (ipl 2022 csk vs kkr chennai super kings ruturaj out on duck umesh yadav take wickets at wankhede stadium mumbai )
ऋतुराज खातंही उघडण्यात अपयशी ठरला. ऋतुराज भोपळा न फोडता माघारी परतला आहे. ऋतुराजला उमेश यादवने विकेटकीपरच्या हाती कॅच आऊट केलं. ऋतुराजने अशा प्रकाराने आऊट झाल्याने त्याने त्याच्या चाहत्यांची निराशा केली.
मोसमाची सुरुवात नो बॉलने
दरम्यान या मोसमातील सुरुवात ही नो बॉलने झाली. मोसमातील पहिली ओव्हर कोलकाताच्या उमेश यादवने टाकली. उमेशने पहिलाच नो बॉल टाकला.
कोलकाता नाईट रायडर्सचे अंतिम 11 खेळाडू - श्रेयस अय्यर (कर्णधार), वेंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे, नीतीश राणा, सॅम बिलिंग्स, आंद्रे रसेल, शेल्डन जॅक्सन, सुनील नरेन, शिवम मावी, उमेश यादव आणि वरुण चक्रवर्ती.
सीएसकेची प्लेइंग इलेव्हन - रवींद्र जाडेजा (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड, डेवन कॉनवे, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, एमएस धोनी, शिवम दुबे, ड्वेन ब्रावो, तुषार देशपांडे, मिचेल सँटनर आणि एडम मिल्न.