मुंबई :  आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) 59 व्या सामन्यात राडा पाहायला मिळाला. चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यातील सामन्यादरम्यान एक अशी घटना  घडली, ज्यामुळे आयपीएलची लाज निघाली. फलंदाजाला किंवा गोलंदाजाला अंपायरने दिलेला निर्णय पटला नाही, तर त्याला आव्हान देता येत. खेळाडू किंवा टीमला रिव्हूयूव्ह (Review) घेता येतो. (ipl 2022 csk vs mi chennai super kings opener devon conway not give drs due to technical issue)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र तांत्रिक बिघाडामुळे चेन्नईच्या फलंदाजाला डीआरस घेता आलं नाही. परिणामी अंपायरने बाद केल्याचा निर्णय हा फलंदाजाला मानावा लागला. या सर्व प्रकरणावरुन आता वादाला तोंड फुटलंय. नेटकऱ्यांनीही या प्रकरणावरुन जोरदार टीका केली आहे. 


नक्की काय झालं? 


सामन्यातील पहिल्या ओव्हरमधील डॅनियल सॅम्सने टाकली. या ओव्हरमधील दुसऱ्याच बॉलवर सॅम्सने डेव्हॉन कॉनवेला एलबीडब्लूय आऊट केलं. अंपायरने कॉनव्हेला बाद घोषित केलं. 


मात्र कॉनव्हेला हा निर्णय मान्य नव्हता. त्यामुळे कॉनव्हेला रिव्ह्यू घ्यायचा होता. मात्र तांत्रिक बिघाडामुळे कॉनव्हेला रिव्ह्यू घेता आला नाही. काही वेळानंतर हा तांत्रिक बिघाड दुरुस्त झाला. मात्र तोवर उशीर झाला होता. 


मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, रमनदीप सिंह, ट्रिस्टन स्टब्स, टिम डेविड, डेनियल सॅम्स, ऋतिक शौकीन, जसप्रीत बुमराह, रिले मेरेडिथ आणि कुमार कार्तिकेय. 


चेन्नई सुपर किंग्स प्लेइंग इलेव्हन : ऋतुराज गायकवाड, डेवोन कॉनवे, रॉबिन उथप्पा, अंबाती रायडू, शिवम दुबे, एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), मोईन अली, ड्वेन ब्रावो, मुकेश चौधरी, महेश थीक्षाना आणि  सिमरजीत सिंह.