IPL 2022, CSK vs PBKS | चेन्नईचा टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय
चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : आयपीएलच्या 15 व्या हंगामात (IPL 2022) आज (3 एप्रिल) चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्ध पंजाब किंग्स (Punjab Kings) यांच्यात सामना होणार आहे. पंजाब आणि चेन्नईचा हा या मोसमातील तिसरा सामना आहे. चेन्नईने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी मुंबईतील बेब्रॉन स्टेडियममध्ये सुरुवात होणार आहे. (ipl 2022 csk vs pbks chennai super kings win toss and elect bowling at brabourne stadium)
याआधीच्या दोन्ही सामन्यात चेन्नईला पराभव स्वीकारावा लागला आहे. तर पंजाबने 1 मॅच जिंकली आहे. त्यामुळे या सामन्यात दोन्ही संघांचा विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न असणार आहे.
आकडेवारी कोणाच्या बाजूने?
आयपीएलमध्ये दोन्ही संघ आतापर्यंत एकूण 25 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये चेन्नईचा बोलबाला राहिला आहे. चेन्नईने पंजाबचा 15 वेळा पराभव केला आहे. तर पंजाबने चेन्नईवर 10 सामन्यात मात केली आहे.
पंजाबकडून 2 खेळाडूंचं पदार्पण
पंजाबने टीममध्ये 2 बदल केले आहेत. पंजाबकडून वैभव अरोरा आणि जितेश शर्मा या दोघांनी डेब्यू केलंय. या दोघांना हरप्रीत ब्रार आणि अंगद बावा यांच्या जागी संधी दिली आहे.
चेन्नई प्लेइंग इलेव्हन : रवींद्र जडेजा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, मोईन अली, अंबाती रायुडू, शिवम दुबे, महेंद्रसिंह धोनी (विकेटकीपर), ड्वेयन प्रिटोरियस, ड्वेन ब्राव्हो, ख्रिस जॉर्डन आणि मुकेश चौधरी.
पंजाब प्लेइंग इलेव्हन : मयंक अग्रवाल (कॅप्टन), शिखर धवन, भानुका राजपक्षे (विकेटकीपर), लियाम लिविंगस्टन, जितेश शर्मा, शाहरुख खान, वैभव अरोरा, ओडियन स्मिथ, कगिसो रबाडा, अर्शदीप सिंह आणि राहुल चाहर.