IPL 2022 CSK vs PBKS | पंजाबचा चेन्नईवर 54 धावांनी दणदणीत विजय
पंजाब किंग्सने (Punjab Kings) चेन्नई सुपर किंग्सवर (Chennai Super Kings) 53 धावांनी विजय मिळवला आहे.
मुंबई : पंजाब किंग्सने (punjab kings) चेन्नई सुपर किंग्सवर (chennai super kings) 54 धावांनी शानदार विजय मिळवला आहे. पंजाबचा या मोसमातील हा दुसरा विजय ठरला आहे. पंजाबने चेन्नईला विजयासाठी 181 धावांचे आव्हान दिले होते. मात्र पंजाबच्या भेदक गोलंदाजीसमोर चेन्नईचा बाजार 18 ओव्हरमध्ये 126 धावांवरच उठला. चेन्नईचा हा या मोसमातील सलग तिसरा पराभव ठरला. (ipl 2022 csk vs pbks punjab kings beat chennai super kings by 54 runs)
चेन्नईकडून शिवम दुबेने सर्वाधिक 57 धावा केल्या. महेंद्र सिंह धोनीने 23 धावांची खेळी केली. तर अंबाती रायुडू आणि रॉबिन उथप्पान या दोघांनी प्रत्येकी 13 धावांचं योगदान दिलं.
पंजाबकजून राहुल चहरने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. लियाम लिविंगस्टोन आणि वैभव अरोडा या जोडीने प्रत्येकी 2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर कगिसो रबाडा, अर्शदीप सिंह आणि ओडेन स्म्थि या तिकडीने प्रत्येकी 1 विकेट मिळवली.
त्याआधी पंजाब किंग्सने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 180 धावा केल्या. पंजाबकडून लियाम लिविंगस्टोनने (Liam Livingstone) सर्वाधिक 60 धावांची तुफानी खेळी केली. या 32 बॉलच्या खेळीत त्याने 5 फोर आणि 5 सिक्स खेचले. त्याशिवाय शिखर धवनने 33 आणि जितेश शर्माने 26 रन्सचं योगदान दिलं.
चेन्नईकडून ख्रिस जॉर्डन आणि मोईन अलीने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर मुकेश चौधरी, ड्वेन ब्राव्हो आणि कॅप्टन रवींद्र जाडेजाने प्रत्येकी 1 फलंदाजाला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.
चेन्नई प्लेइंग इलेव्हन : रवींद्र जडेजा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, मोईन अली, अंबाती रायुडू, शिवम दुबे, महेंद्रसिंह धोनी (विकेटकीपर), ड्वेयन प्रिटोरियस, ड्वेन ब्राव्हो, ख्रिस जॉर्डन आणि मुकेश चौधरी.
पंजाब प्लेइंग इलेव्हन : मयंक अग्रवाल (कॅप्टन), शिखर धवन, भानुका राजपक्षे (विकेटकीपर), लियाम लिविंगस्टन, जितेश शर्मा, शाहरुख खान, वैभव अरोरा, ओडियन स्मिथ, कगिसो रबाडा, अर्शदीप सिंह आणि राहुल चाहर.