M S Dhoni | केला नाद झाला बाद! धोनीची हुशारी आणि भानुका माघारी
M S Dhoni Run Out To Bhanuka Rajapaksa | चेन्नईने (CSK) दुसऱ्या विकेटची विकेटची संधी गमावलेली. मात्र धोनीच्या (M S Dhoni) समय सुचकतेमुळे आणि त्याच्या चपळतेमुळे चेन्नईला दुसरी विकेट (Bhanuka Rajapaksa) मिळाली.
मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील 11 वा सामना (IPL 2022) चेन्नई सुपर किंग्स (CSK) विरुद्ध पंजाब किंग्स (PBKS) यांच्यात खेळण्यात येत आहे. चेन्नईने टॉस जिंकून पंजाबला बॅटिंगसाठी भाग पाडलं. चेन्नईला पहिल्याच ओव्हरमधील दुसऱ्याच चेंडूवर पहिली विकेट मिळाली. तर चेन्नईला दुसरी विकेट ही विकेटकीपर महेंद्रसिंह धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) स्टंपमागील चपळ आणि चलाखीमुळे मिळाली. चेन्नईने दुसऱ्या विकेटची विकेटची संधी गमावलेली. मात्र धोनीच्या समय सुचकतेमुळे आणि त्याच्या चपळतेमुळे चेन्नईला दुसरी विकेट मिळाली. धोनीने हुशारीने भानुका राजपक्साला (Bhanuka Rajapaksa) रनआऊट करत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. (ipl 2022 csk vs pbks wicket keeper mahendra singh dhoni sensational run out dismissal to bhanuka rajapaksa)
नक्की काय झालं?
त्याचं झालं असं की, सामन्यातील दुसरी ओव्हर ख्रिस जॉर्डन टाकत होता. ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर भानुकाने फटका मारला. मात्र भानुका आणि त्याच्या सोबत असलेल्या शिखर धवनमध्ये धाव घेण्यावरुन गडबड झाली.
भानुकाने चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. त्याने क्रीझ क्रॉसही केलं. मात्र नॉन स्ट्राईकवर असलेल्या शिखरने बॉल फिल्डरच्या हातात असल्याचं पाहून धाव घेण्यास नकार दिला. त्यामुळे भानुकाला परत मागे फिरावं लागलं.
तेवढ्यात जॉर्डनने बॉल स्ट्राईक एंडच्या स्टंपवर थ्रो केला, मात्र तो चुकला. पण स्टंपमागे असलेल्या धोनीने आपली जागा सोडून स्टंप कव्हर करण्यासाठी धावत आला. फिल्डरने केलेला चुकलेला थ्रो धोनीने कलेक्ट केला आणि उडी मारत भानुकाला रन आऊट केलं.
धोनीची टी 20 कारकिर्द
धोनीने आतापर्यंत खेळलेल्या एकूण 349 सामन्यांमध्ये 7 हजार 1 धावा केल्या आहेत. धोनीने नुकत्याच लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध झालेल्या सामन्यात 6 बॉलमध्ये 16 धावांची खेळी करत 7 हजार धावांचा टप्पा पार केला होता.
धोनी या 15 व्या मोसमात शानदार कामगिरी करताना दिसतोय. धोनीने सलामीच्या सामन्यात कोलकाता विरुद्ध 38 बॉलमध्ये 50 धावांची अर्धशतकी खेळी केली होती.
चेन्नई प्लेइंग इलेव्हन : रवींद्र जडेजा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, मोईन अली, अंबाती रायुडू, शिवम दुबे, महेंद्रसिंह धोनी (विकेटकीपर), ड्वेयन प्रिटोरियस, ड्वेन ब्राव्हो, ख्रिस जॉर्डन आणि मुकेश चौधरी.
पंजाब प्लेइंग इलेव्हन : मयंक अग्रवाल (कॅप्टन), शिखर धवन, भानुका राजपक्षे (विकेटकीपर), लियाम लिविंगस्टन, जितेश शर्मा, शाहरुख खान, वैभव अरोरा, ओडियन स्मिथ, कगिसो रबाडा, अर्शदीप सिंह आणि राहुल चाहर.