मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमासाठी (IPL 2022) सर्व संघ सज्ज आहेत. सर्व टीम आपल्या कॅम्पमध्ये आपल्या सलामीच्या सामन्याच्या दृष्टीने जोरदार तयारी करत आहेत. दिल्ली कॅपिट्ल्सला (Delhi Capitals) आतापर्यंत एकूण 14 मोसमांमध्ये एकदाही ट्रॉफी जिंकता आलेली नाही. त्यामुळे दिल्ली या वेळेस शानदार कामगिरी करत पहिल्यांदा ट्रॉफी जिंकण्याच्या प्रयत्नात असणार आहे. मात्र याआधीच दिल्ली कॅपिट्ल्सला मोठा धक्का बसला आहे. (ipl 2022 dc delhi capitals bowler anrich nortje might do not play first 2 matchs due to injuey)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीचा वेगवान गोलंदाज एनरिच नॉर्टजेला (Anrich Nortje) या मोसमातील पहिल्या काही सामन्यांना खेळता येणार नाही. त्यामुळे दिल्लसाठी हा मोठा धक्का समजला जात आहे. 


नक्की कारण काय?


आयपीएलच्या 15 व्या हंगामासाठी एनरिच नॉर्तजे मुंबईत पोहचला आहे. मात्र तो अजूनही फिट नसल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे एनरिच लखनऊ विरुद्ध 7 एप्रिलला होणाऱ्या सामन्यापासून टीमसह जोडला जाऊ शकतो. त्यामुळे एनरिच पहिल्या 2 सामन्यांना मुकू शकतो. त्यामुळे दिल्लीसाठी हा झटकाच आहे.   


अशी आहे दिल्लीची टीम 


ऋषभ पंत (कॅप्टन), अक्षर पटेल, पृथ्वी शॉ, एनरिक नॉर्तजे, डेविड वॉर्नर, मिशेल मार्श, शार्दुल ठाकुर, मुस्तफिजुर रहमान, कुलदीप यादव, अश्विन हेब्बर, अभिषेक शर्मा, कमलेश नागरकोटी, केएस भरत, मनदीप सिंह, खलील अहमद, चेतन सकारिया, ललित यादव , रिपल पटेल, यश ढुल, रोवमैन पॉवेल, प्रवीण दुबे, लुंगी एनगिडी, विक्की ओस्तवाल आणि सरफराज खान.