धक्कादायक| कोरोनाचा कहर, दिल्ली टीममधील दिग्गजाच्या कुंटुबाला कोरोना
आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) कोरानाने रौद्र रुप धारण केलं आहे. एका मागोमाग एक जण पॉझिटिव्ह सापडत आहेत.
मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) कोरानाने रौद्र रुप धारण केलं आहे. एका मागोमाग एक जण पॉझिटिव्ह सापडत आहेत. आता दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) हेड कोच रिकी पाँन्टिंग (Ricky Ponting) यांच्या कुटुंबातील 1 सदस्याला कोरोना झाला आहे. त्यामुळे त्याला 5 दिवस क्वारंटाईन रहावं लागणार आहे. दिल्ली कॅपिट्ल्सने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. (ipl 2022 dc delhi head coach ricky ponting family member tested corona positive before dc vs rr match)
सुदैवाने यात पॉन्टिंगचा कोरोना रिपोर्ट हा नेगिटिव्ह आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाचा ससेमिरा लागला आहे. दिल्ली टीममधील अनेक सदस्य हे कोरोनाशी झुंज देत आहेत.
पाँटिंगचे कुटुंबियांना क्वारंटाईन ठेवण्यात आलंय. "पॉन्टिंगची दोनदा कोरोना टेस्ट करण्यात आली. मात्र पॉन्टिंगला कोरोनाचा त्रास झालेला नाही.
टीमच्या खबरदारीचा उपाय म्हणून टीम मॅनेजमेंट आणि मेडिकल टीमने पॉन्टिंगच्या कुटुंबातील पॉझिटिव्ह सदस्याला 5 दिवस क्वारंटाईनमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे", अशी माहिती दिल्ली टीमकडून देण्यात आली आहे.