मुंबई : दिल्ली विरुद्ध झालेल्या सामन्यात लखनऊला 6 विकेट्सने विजय मिळाला. या विजयामध्ये आयुष बदोनी आणि फलंदाजांचा मोठा वाटा आहे. पण एका बॉलर्सचं विशेष योगदान आहे. 10 हजार धावा करणाऱ्या धडाकेबाज फलंदाजाला ज्युनिअर बॉलरनं आऊट करत तंबुत पाठवलं. त्याच्या कामाचं कौतुक जगभरात होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नर आपल्या तुफान बॅटिंगसाठी प्रसिद्ध आहे. मात्र लखनऊ विरुद्धच्या सामन्यात त्याचं काहीही चाललं नाही. ज्युनिअर बॉलर रवी बिश्नोईच्या बॉलिंगसमोर त्याला घाम फुटला. 


लखनऊकडून 9 व्या ओव्हरसाठी रवी बिश्नोई मैदानात आला. त्याने गुगली बॉल टाकला ज्यात डेव्हिडने मोठा शॉट मारला. मात्र त्याला अपेक्षा फोल ठरल्या आणि आयुष बदोनीनं कॅपआऊट केलं. 


रवी बिश्नोईनं वॉर्नला 6 बॉल टाकले त्यापैकी त्याच्या 3 बॉलवर डेव्हिड वॉर्नर आऊट झाला आहे. त्याने केवळ 5 धावा केल्या. बिश्नोईने टाकलेले बॉल खेळणं वॉर्नरला अवघड जात आहे. बिश्नोईनं 22 रन देऊन 2 विकेट्स दिल्ली विरुद्धच्या सामन्यात आपल्या नावावर केल्या. 


रवी बिश्नोईची तुलना अफगाणिस्तानचा स्पिनर राशिद खानशी केली जाते. रोहित शर्मा कर्णधारपदावर आल्यानंतर बिश्नोईनं टीम इंडियासाठी डेब्यू केलं. त्याला पहिल्याच सामन्यात मॅन ऑफ द मॅच पुरस्कारही मिळाला. 


टी 20 सामन्यात त्याने 4 विकेट्स घेतल्या आहेत. लखनऊ टीमने रवि बिश्नोईला आपल्या टीममध्ये घेतलं आहे. त्याने दिल्ली विरुद्धच्या सामन्यात 4 ओव्हरमध्ये 22 धावा देऊन 2 विकेट्स घेतल्या आहेत.