मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) मुंबईची इंडियन्सची (Mumbai Indians) सुरुवात पराभवाने झाली. प्रत्येक टीमची स्पर्धेतील सुरुवात विजयाने करण्याची इच्छा असते. मात्र मुंबईला यंदाही आपल्या सलामीच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. दिल्ली कॅपिट्ल्सने (Delhi Capitals) मुंबईचा 4 विकेट्सने पराभव केला. यानंतर मुंबईसाठी आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. मुंबईकडून सामन्यादरम्यान मोठी चूक झाली आहे. या चुकीचा फटका कॅप्टन म्हणून रोहित शर्माला (Rohit Sharma) बसला आहे. रोहित शर्माला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. (ipl 2022 dc vs mi mumbai indians rohit sharma fined for slow over rate)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नक्की काय झालं? 


स्लो ओव्हर रेटमुळे ही कारवाई करण्यात आली आहे.  नियमांनुसार एका तासात ठराविक ओव्हर टाकल्या जाणं हे अपेक्षित असतं. मात्र रोहित शर्माला कॅप्टन म्हणून तो वेग कायम राखता आला नाही अन् त्या नियमाचं उल्लंघन झालं. यामुळे कॅप्टन या नात्याना रोहितला हा दंड ठोठावला गेला आहे. आयपीएलने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. 


निवदेनात काय म्हटलय? 


आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलने ट्विटद्वारे एक निवेदन जारी केलंय. "मुंबईने दिल्ली विरुद्धच्या सामन्यात ओव्हर रेट कायम राखला नाही. या मोसमात मुंबईकडून ही चूक होण्याची पहिलीच वेळ होती. त्यामुळे मुंबईचा कॅप्टन रोहित शर्माला 12 लाख रुपयांचा दंड सुनावण्या आला आहे", असं या निवेदनात म्हटलं आहे.