IPL 2022: डु प्लेसीकडून दिनेक कार्तिकचं कौतूक, म्हणाला DK धोनी सारखा...
KKR चा कमी स्कोर असतानाही 3 विकेटने पराभव करणाऱ्या आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसीने दिनेश कार्तिकचं कौतूक केलं आहे.
IPL 2022 : RCB ने कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) 3 विकेटने पराभव केला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) चा कर्णधार फाफ डु प्लेसीने दिनेश कार्तिकचं कौतूक केलं आहे. दिनेश कार्तिकचा अनुभव संघाच्या कामी आला. त्याने यावेळी धोनीसोबत त्याची तुलना केली.
RCB पुढे विजयासाठी 129 धावांचं लक्ष्य होतं. शेवटच्या ओव्हरमध्ये 7 रन हवे होते. कार्तिकने एक सिक्स आणि एक फोर मारत संघाला विजय मिळवून दिला.
आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसीने म्हटलं की, ‘हा चांगला विजय होता. छोटा स्कोर असताना सकारात्मक विचार असला पाहिजे. शेवटपर्यंत सामना जायला नको होता. पण गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली.
‘शेवटी डीके (कार्तिक) चा अनुभव कामी आला. तो शेवटच्या 5 ओव्हरमध्ये इतका शांतचित्त होता. जसा महेंद्रसिंह धोनी असतो.'
'दोन-तीन दिवसापूर्वी येथे (D.Y Patil Stadium) 200 विरुद्ध 200 होते. पण आज 120 विरुद्ध 120. आम्हाला चांगल्या प्रकारे विजय मिळवायला हवा होता. पण विजय तर विजय असतो.'