मुंबई : आयपीएलच्या 15  मोसमातील (IPL 2022) 51 वा सामना गुजरात टायटन्स (Gujrat Titans) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात खेळवण्यात येणार आहे. गुजराने टॉस जिंकला आहे. कॅप्टन हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबई पहिले बॅटिंग करणार आहे. (ipl 2022 gt vs mi gujrat titans win toss and elect to bowl agaist mumbai indians) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई या सामन्यात अर्जुन तेंडुलकरला पदार्पणाची संधी देईल, अशी आशा होती. मात्र पुन्हा एकदा चाहत्यांची निराशा झाली आहे. यामुळे अर्जुनच्या पदार्पणाची प्रतिक्षा आणखी लांबणीवर पडली आहे. 


मुंबईने या सामन्यासाठी एक बदल केला आहे. ऋतिक शौकीनच्या जागी मुरगन अश्विनला संधी देण्यात आली आहे. तर कर गुजरात टीमने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.  


मुंबई प्लेइंग इलेव्हन


रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेविड, कायरन पोलार्ड, डेनियल सैम्स, मुरुगन अश्विन, कुमार कार्तिकेय, जसप्रीत बुमराह आणि रिले मेरेडिथ.


गुजरात टायटन्स : ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, प्रदीप सांगवन, लॉकी फर्ग्यूसन, अल्जारी जोसेफ आणि मोहम्मद शमी.