IPL 2022 : आयपीएल 2022 (IPL 2022) च्या मेगा ऑक्शनवर जगभरातील क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून आहे. बीसीसीआयकडून (BCCI) लिलावासाठी 590 खेळाडूंची यादी तयार करण्यात आली आहे. ज्यामध्ये 15 देशातील खेळाडूंचा समावेश आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये अनेक स्टार खेळाडूंनी माघार घेतली आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये क्रिस गेल, एबी डिविलियर्स आणि लसिथ मलिंगा सारखे खेळाडू दिसणार नाहीत. पण त्यांची जागा ज्युनिअर खेळाडू घेऊ शकतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण आफ्रिकेचा बेबी डिव्हिलियर्स म्हणून ओळखला जाणारा डेवाल्ड ब्रेविस (Dewald Brevis) आणि ज्युनियर मलिंगा म्हणून प्रसिद्ध झालेला श्रीलंकेचा फास्ट बॉलर मथीशा पथिराना (Matheesha Pathirana) यांच्यावर देखील बोली लाग्याची शक्यता आहे.


दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) डेवाल्ड ब्रेविसची स्टाईल डिव्हिलियर्स सारखी आहे. तो आयपीएल (IPL) मध्ये आरसीबी (RCB) कडून खेळू इच्छित आहे. अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये त्याने शानदार कामगिरी केली होती.


पथिरानाची मलिंगा स्टाईल


19 वर्षाचा मथीशा पथिराना याची स्टाईल ही एकदम लसिथ मलिंगा (Lasith Malinga) सारखीच आहे. मलिंगा हा बराच काळ मुंबई इंडियंस (Mumbai Indians) संघाचा भाग राहिला आहे. पथिराना अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये देखील खेळला. तो मागच्या सीजनमध्ये चेन्नई सुपरकिंग्जसाठी (CSK) खेळत होता. एमएस धोनी (MS Dhoni) चा संघ पुन्हा एकदा त्याच्यावर बोली लावू शकते.


12 आणि 13 फेब्रुवारी रोजी बंगळुरुमध्ये मेगा ऑक्शन होणार आहे. यंदा 10 संघ आयपीएलमध्ये खेळणार आहेत. तर 60 ऐवजी 74 सामने होणार आहेत. लखनऊ आणि अहमदाबाद हे दोन संघ पहिल्यांदाच आयपीएलमध्ये खेळणार आहेत. लखनऊने केएल राहुल (KL Rahul) याला तर अहमदाबादने हार्दिक पंड्या (Hardik Pandya) ला कर्णधार बनवले आहे.