IPL 2022 : मुंबई का शाणा बोलताच भिडले 2 क्रिकेटपटू ... व्हीडिओ व्हायरल
दोन क्रिकेटपटू आपसात भिडले आहेत. या दोघांचा व्हीडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (ipl 2022) 19 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स (DC) यांच्यात मुंबईतील बेब्रॉन स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्सने कोलकातावर 44 धावांनी विजय मिळवला. दिल्लीने कोलकाताला विजयासाठी दिलेल्या 216 धावांचे आव्हान दिले. मात्र कोलकाताची टीम 19.4 ओव्हरमध्ये 171 धावांवर ऑलआऊट झाली. या सामन्याआधी दोन क्रिकेटपटू आपसात भिडले आहेत. या दोघांचा व्हीडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (ipl 2022 kkr vs dc kolkata captain shreyas iyer and shardul thakur funny conversation video viral)
कोलकाताचा कॅप्टन श्रेयस अय्यर (Shreys Iyer) आणि दिल्लीचा ऑलराउंडर शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) हे आपसात भिडले आहेत. या दोघांच्या शाब्दिक वादावादीचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
श्रेयस आणि शार्दुलमधील सवांद
श्रेयस : काय लॉर्ड (शार्दुल) दिल्लीच्या गोटात तु चमकतोयस.
शार्दुल : तु पण तर चमकतोयस. कोलकाताच्या जर्सीत तुझा चेहरा आणखी उजळलाय.
श्रेयस : आज एक छोटी झलक पाहायला तयार हो. तुला तर माहितीये माझा बेब्रोन स्टेडियममध्ये रेकॉर्ड कसा आहे ते.
शार्दुल : मुंबईकडून आहेस तर शाणा बनतोयस काय, माहितीये ना नेट्समध्ये तुला किती वेळा चकवा दिलाय.
श्रेयस : म्हणून तर त्याला नेट्स म्हणतात ना माझ्या भावा. मी आणि केकेआर सज्ज आहोत.
शार्दुल : मी दिल्लीत आहे आणि सज्ज आहे. धमाल करण्यासाठी सज्ज आहे. मैदानात भेटुयात.
श्रेयस : ये मग, कोणासाठी थांबलायस.
दिल्लीने शार्दुल ठाकूरला आयपीएलच्या 15 व्या मोसमातील मेगा लिलावात 10 कोटी 75 लाख मोजून आपल्या ताफ्यात घेतलं. शार्दुल ठाकूरची बेस प्राईज ही कोटी इतकी होती. शार्दुल याआधी चेन्नईकडून खेळायचा.
तर दुसऱ्या बाजूला कोलकाताने श्रेयस अय्यरला 12 कोटी 25 लाख रुपयात खरेदी केलं. याआधी श्रेयस दिल्लीकडून खेळायचा. श्रेयसने आपल्या नेतृत्वा दिल्लीला आयपीएलच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहचवलं होतं.