मुंबई : आंद्रे रसेलच्या (Andre Russell) झंझावाती खेळीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) पंजाब किंग्सवर (PBKS) 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. पंजाबने कोलकाताला विजयासाठी 138 धावांचे आव्हान दिले होते. कोलकाताने हे आव्हान 14.3 ओव्हरमध्येच पूर्ण केलं. आंद्रे रसेल कोलकाताच्या विजयाचा हिरो ठरला. आंद्रे रसेलने नाबाद झंझावाती अर्धशतकी खेळी केली. (ipl 2022 kkr vs pbks kolkata knight riders win by 6 wickets against punjab kings at wankhede stadium mumbai)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंद्रे रसेलने 31 चेंडूत 8 खणखणीत सिक्स आणि 2 चौकारांसह नाबाद 70 धावांची विजयी खेळी केली. त्याशिवाय कॅप्टन श्रेयस अय्यरने 26 आणि सॅम बिलिंग्सने 24 धावांचं योगदान दिलं. अजिंक्य रहाणेने 12 रन्स केल्या. पंजाबकडून कगिसो रबाडाने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. 


त्याआधी केकेआरने टॉस जिंकून पंजाबला बॅटिंगसाठी भाग पाडलं.  पंजाबने  18.2 ओव्हरमध्ये ऑलआऊट 137 धावा केल्या. त्यामुळे पंजाबकडून केकेआरला 138 धावांचंच आव्हान मिळालं. 


पंजाबकडून भानुका राजपक्षेने (Bhanuka Rajpaksa) सर्वाधिक 31 धावांची खेळी केली. कगिसो रबाडाने 25 धावांचं योगदान दिलं.  लियाम लिविंगस्टोनने 19 रन्स केल्या. तर शिखर धवनने 16 आणि हरप्रीत ब्रारने 14 रन्स केल्या.


कोलकाताकडून उमेश यादवने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. टीम साऊथीने 2 विकेट्स घेतल्या. तर सुनीर नरेन, आंद्रे रसेल आणि शिवम मावीने प्रत्येकी 1 विकेट घेतला.


केकेआर प्लेइंग इलेव्हन | श्रेयस अय्यर (कॅप्टन), अजिंक्य रहाणे,  वेंकटेश अय्यर, नितीश राणा, सॅम बिलिंग्स (विकेटकीपर), आंद्रे रसेल, सुनील नारायण, टीम साऊथी, उमेश यादव, शिवम मावी आणि वरुण चक्रवर्ती. 


पंजाबची प्लेइंग इलेव्हन : मयंक अग्रवाल (कॅप्टन), शिखर धवन, लियाम लिविंगस्टन, भानुका राजपक्षे (विकेटकीपर), शाहरुख खान, ओडियन स्मिथ, राज बावा, अर्शदीप सिंह, हरप्रीत बराड, कगिसो रबाडा आणि राहुल चाहर.