मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) 7 वा सामना आज (31 मार्च) खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स (LSG) आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आमनेसामने असणार आहेत. या सामन्याचं आयोजन हे मुंबईतील बेब्रॉन स्टेडियममध्ये करण्यात आलंय. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा ऑलराऊंडर ड्वेन ब्राव्होला (Dwayne Bravo) ऐतिहासितक कामगिरी करण्याची मोठी संधी आहे. (ipl 2022 lsg vs csk all rounder dwayne bravo has needed to 1 wicket for break laisth malinga most wickets record in ipl)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्राव्होला आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम (Most Wickets in Ipl) आपल्या नावावर करण्याची संधी आहे. sब्राव्होला या विक्रमसाठी फक्त अवघ्या 1 विकेट्सची गरज आहे. सध्या हा विक्रम यॉर्कर किंग लसीथ मलिंगाच्या (Laisth Malinga) नावावर आहे.


मलिंगाने 122 सामन्यांमध्ये 170 विकेट्स घेतल्या आहेत. तर ब्राव्होच्या नावावर 152 मॅचमध्ये 170 विकेट्सची नोंद आहे. सध्या ब्राव्हो आणि मलिंगा 170 विकेट्ससह संयुक्तरित्या अव्वलस्थानी आहेत. त्यामुळे फक्त लखनऊ विरुद्ध 1 विकेट घेत ब्राव्हो आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा बॉलर ठरेल.