मुंबई : आयपीएलचा 15 मोसमातील  7 वा सामना हा लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) यांच्यात खेळवण्यात आला. चेन्नईला या सामन्यात या 200 पेक्षा अधिक धावा करुनही पराभवाचा सामना करावा लागला. चेन्नईने विजयासाठी दिलेले 211 धावांचं आव्हान लखनऊने 3 बॉलआधी 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. लखनऊने यासह आपला पहिला विजय नोंदवला. (ipl 2022 lsk vs csk lucknow supergiant become suceesfully chace 4th biggest target in ipl history)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लखनऊने विजयासह मोठा किर्तीमान केला. लखनऊ आयपीएलमधील सर्वाधिक चौथ्या मोठ्या विजयी धावांचा पाठलाग करणारी चौथी टीम ठरली.


राजस्थानने आयपीलच्या इतिहासात सर्वात मोठ्या रन्सचं चेसिंग केलं आहे. राजस्थानने 2020 मध्ये पंजाब किंग्स विरुद्ध 224 धावांचा यशस्वी पाठलाग करत विजय मिळवला होता.


तर याबाबतीत मुंबई इंडियन्सचा दुसरा क्रमांक आहे. मुंबईने 2012 मध्ये चेन्नई विरुद्ध 219 धावांचा यशस्वीरित्या पाठलाग केला होता.  


तिसऱ्या क्रमांकावरील टीमही राजस्थानच आहे. राजस्थानने पहिल्या मोसमात डेक्कच चार्जर्स विरुद्ध 215 धावा केल्या आणणि विजय मिळवला होता.