मुंबई : आयपीएलचे सामने 26 मार्चपासून सुरू होत आहे. पंधराव्या हंगामातील पहिला सामना चेन्नई विरुद्ध कोलकाता होणार आहे. या सामन्याआधी चेन्नई समोरच्या अडचणी संपण्याचं नाव घेत नाहीत. दीपक चहर आयपीएलचे सुरुवातीचे सामने खेळणार नाही. आता आणखी एक चेन्नईचा सुपरस्टार खेळाडू पहिला सामना खेळणार नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्टार क्रिकेटपटू पहिल्या सामन्यातील प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर असणार आहे. त्यामुळे कर्णधार धोनीचं टेन्शन वाढलं आहे. मोईन अली काही कारणामुळे पहिला सामना खेळू शकणार नाही. त्यामुळे त्याच्या जागी संघात कोणाला उतरवायचं हा धोनीसमोर मोठा प्रश्न असणार आहे.


मोईन अलीच्या पासपोर्टमध्ये अडचणी आल्या आहेत. त्यामुळे त्याला व्हिजासाठी परवानगी मिळण्यास विलंब होत आहे. त्याला व्हिजा न मिळाल्याने तो वेळेत पहिल्या सामन्यासाठी पोहोचू शकत नाही. याचा फटका चेन्नई संघाला पहिल्या सामन्यात होणार आहे. 


चेन्नईचा पुढचा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध होणार आहे. चेन्नईने यंदा इंग्लंडचा अष्टपैलू मोईन अलीला 7 कोटी देऊन संघात घेतलं आहे. याशिवाय ऋतुराज गायकवाडला देखील संधी देण्यात आली आहे. मोईन अलीची इंग्लंड संघाकडून टी 20 सामन्यातील कामगिरी खूपच चांगली राहिली आहे.