मुंबई : ऑलराऊंडर रवींद्र जाडेजाने (Ravindra Jadeja) शनिवारी चेन्नई सुपर किंग्सची (CSK Captaincy) कॅप्टन्सी सोडली. जाडेजाने स्वत:च्या कामगिरीवर अधिक लक्ष केंद्रीत करण्यासाठी नेतृत्व सोडल्याचं म्हटलं. जाडेजानंतर चेन्नईची मदार पुन्हा महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) सांभाळणार आहे. जाडेजाच्या नेतृत्वात चेन्नईला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यानंतर जाडेजाने हा निर्णय घेतला. दरम्यान जाडेजानंतर आणखी एका टीमचा खेळाडू कॅप्टन्सी सोडणार असल्याचं म्हटलं जात आहे. (ipl 2022 mayank agarwal may be step down of pbks captaincy after ravindra jadeja) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जाडेजाला आपल्या कॅप्टन्सीत चेन्नईला आयपीएलच्या 15 व्या मोसमातील 8 पैकी 2 सामन्यात टीमला विजय मिळवून देता आला.  चेन्नई अपयशी ठरली.  त्याच प्रकारे आणखी एक टीम सातत्याने अपयशी ठरतेय ती म्हणजे (Punjab Kings) पंजाब किंग्स.


मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) पहिल्यांदाच कॅप्टन्सी करतोय. मात्र त्याला आपल्या नेतृत्वाची छाप सोडता आली नाही. पंजाबला 9 पैकी 5 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे पंजाबवर प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडण्याच संकंट घोंगावतंय.


मयंकची निराशाजनक कामगिरी


मयंक पंजाब टीमप्रमाणे अपयशी ठरलाय. मयंकच्या कामगिरीवर कॅप्टन्सीचा दबाव पाहायला मिळाला. मयंकला 8 सामन्यात फक्त 161 धावाच करता आल्या. पंजाबकडे शिखर धवनसारखा अनुभवी खेळाडू आहे. ज्याला कॅप्टन्सीचा अनुभव आहे. त्यामुळे जर मयंकने कॅप्टन्सी सोडली, तर शिखरला ती जबाबदारी मिळू शकते.