मुंबई : आयपीएलमध्ये पाच ट्रॉफी मिळवणाऱ्या मुंबईचे पंधराव्या हंगामात चांगलेच हाल झाले. पॉईंट टेबलवर विजयाचं एकही खातं उघडण्यात यश आलं नाही. आयपीएलचे सामने खूप अटीतटीचे सुरू आहेत. एक एक रन टीमसाठी महत्त्वाचा आहे. प्ले ऑफची रेस अधिक रंगदार होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या रेसमध्ये मात्र गेल्यावर्षीची विजयी टीम चेन्नई सुपरकिंग्स आणि मुंबई दिसत नाहीत. या दोन्ही टीम या रेसमध्ये खूप मागे आहेत. पॉईंट टेबलवर तर 9 आणि 10 व्या स्थानावर दोन्ही टीम आहेत. यंदाचा हंगाम दोन्ही टीमसाठी अत्यंत वाईट ठरला आहे.


आता दोन्ही टीमला प्लेऑफपर्यंत पोहोचणं शक्य नाही. तसं करायचं असेल तर दोन्ही टीमला प्रत्येक सामना आता जिंकवा लागेल. तरंच प्लेऑफपर्यंत पोहोचू शकतात. चेन्नई टीम 6 पैकी 1 सामना जिंकली आहे. तर मुंबई टीमने 6 पैकी 6 सामने गमवले आहेत. 


आता दिल्ली टीममध्ये कोरोनाचा रुग्ण आढळला आहे. आयपीएलचे सामने कोरोनामुळे स्थगित होण्याची शक्यता फार कमी आहे. पण तरी चुकून हे सामने स्थगित झालेच तर चेन्नई आणि मुंबई टीमला त्याचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. पण तसं झालं नाही तर दोन्ही टीम आयपीएलच्या पंधराव्या हंगामातून प्लेऑफच्या रेसमधून बाहेर झाल्या आहेत.