मुंबई: मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) दुखापतीमुळे आयपीएलच्या 15 व्या मोसमातून (IPL 2022) मधून बाहेर पडावं लागलं. अशा परिस्थितीत मुंबई इंडियन्सने एका नव्या खेळाडूला करारबद्ध केलेय.  हा खेळाडूला सूर्यकुमारच्या जागी संधी देण्यात आली आहे.   सूर्यकुमारच्या जागी आकाश मधवालला (Akash Madhwal) संधी मिळाली आहे. मुंबई फ्रँचायजीने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. (ipl 2022 mi mumbai indians akash madhwal replaces suryakumar yadav for rest of the 15th season) 


कोण आहे आकाश? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आकाश मधवाल हा वेगवान गोलंदाज आहे. आकाशने 2019 मध्ये देशांतर्गत पदार्पण केलं. आकाशने तेव्हापासून  क्रिकेट असोसिएशन ऑफ उत्तराखंडचं  तिन्ही फॉरमॅटमध्ये प्रतिनिधित्व केलंय. मुंबई ताज्या आकडेवारीनुसार पॉइंट्सटेबलमध्ये शेवटच्या दहाव्या क्रमांकावर आहे. 


मुंबईने या मोसमात आतापर्यंत 12 सामने खेळले आहेत. मुंबईला या 12 पैकी फक्त 3 सामन्यात विजय मिळवता आला आहे. मुंबईला या मोसमात  2 सामने खेळायचे आहेत. त्यामुळे उर्वरित 2 सामन्यात खेळण्याची संधी मिळणार का, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.