मुंबई : IPL 2022 च्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेल्या मुंबई इंडियन्सला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज टायमल मिल्स दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. मुंबई फ्रँचायजीने ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. मिल्स बाहेर पडल्याने मुंबईला जबर झटका लागला आहे.  (ipl 2022 mi tristan stubbs to replace tymal mills in mumbai indians 2022 squad rohit sharma) 


मिल्सच्या जागी कोणाला संधी? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिल्सच्या जागी उर्वरित हंगामासाठी दक्षिण आफ्रिकेच्या ट्रिस्टन स्टब्सला संधी दिली आहे", अशी माहिती मुंबईने प्रसिद्ध केलेल्या निवदेनात दिली आहे.  मिल्सने या मोसमात मुंबईकडून खेळलेल्या 5 सामन्यांत केवळ 6 विकेट घेतल्या.


"21 वर्षीय ट्रिस्टनने अलीकडेच झिम्बाब्वे विरुद्ध राष्ट्रीय दक्षिण आफ्रिका अ संघाकडून पदार्पण केलं. ट्रिस्टनचा देशांतर्गत हंगाम अतिशय आश्वासक होता. तसेच नुकत्याच संपलेल्या T20 देशांतर्गत लीगमध्ये त्याने संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती", असंही निवेदनात म्हटलय. 


स्टब्सने 17 टी-20 सामने खेळले आहेत आणि 157.14 च्या स्ट्राइक रेटने 3 अर्धशतकांसह 506 धावा केल्या आहेत. IPL प्रेस रिलीज नुसार, मुंबई फ्रँचायजीने स्टब्सला 20 लाख किंमतीत आपल्यात सामील केलंय.