मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) 33 वा सामना हा मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (MI vs CSK) यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. चेन्नईने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबई पहिले बॅटिंग करणार आहे.  (ipl 2022 mi vs csk chennai super kings win toss elect to bowl against mumbai indians arjun tendulkar not give chance to debut)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सामन्यात मुंबईच्या टीममध्ये सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनला (Arjun Tendulkar) पदार्पणाची संधी मिळेल, अशी दाट शक्यता होती. मात्र अर्जुनला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे अर्जुनच्या पदार्पणाची प्रतिक्षा आणखी लांबणीवर पडली आहे.


मुंबई प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, कायरन पोलार्ड, राइली मेरेडिथ, ऋतिक शौकीन, डेनियल सॅम्स, जसप्रीत बुमराह आणि जयदेव उनादकट.


सीएसकेचे अंतिम 11 शिलेदार : रवींद्र जडेजा (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, शिवम दुबे, एमएस धोनी, ड्वेन ब्रावो, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सँटनर, महीश तीक्षणा आणि मुकेश चौधरी.