पुणे :  आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) 23 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स (MI vs PBKS) यांच्यात खेळवण्यात येणार आहे. मुंबईने टॉस जिंकला आहे. कॅप्टन रोहित शर्माने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. या सामन्याचं आयोजन पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.  (ipl 2022 mi vs pbks mumbai indians win toss and elect to bowl at pune)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईने प्लेइंग इलेव्हनमध्ये एकमेव बदल केला आहे. टीम मॅनेजमेंटने रमनदीपच्या जागी टायमल मिल्सला संधी दिली आहे. तर पंजाब किंग्सने आपली टीम कायम ठेवली आहे. 


दोन्ही संघांची या मोसमातील कामगिरी


पाच वेळा चॅम्पियन असलेल्या मुंबईला या मोसमात आतापर्यंत एकही सामना जिंकता आलेल नाही. मुंबईला पहिल्या 4 सामन्यात दारुण पराभवाला सामोरे जावे लागलंय. दुसरीकडे पंजाबने 2 सामने जिंकले असून केवळ 2 सामने गमावले आहेत.


मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन (विकेटकीपर), डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, कायरन पोलार्ड, जयदेव उनादकट, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स आणि बासिल थंपी.  


पंजाब किंग्स प्लेइंग इलेव्हन : मयंक अग्रवाल (कप्तान), शिखर धवन, जॉनी बेयरस्टो (विकेटकीपर), लियाम लिविंगस्टन, जितेश शर्मा, ओडियन स्मिथ, शाहरुख खान, कगिसो रबाडा, राहुल चाहर, वैभव अरोडा आणि अर्शदीप सिंह.