IPL 2022 | Jos Buttler चा तडाखा, मुंबई विरुद्ध शतकी खेळी
राजस्थान रॉयल्सचाचा (Rajshthan Royals) स्टार ओपनर जॉस बटलरने (Jos Buttler) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध वादळी खेळी करत खणखणीत शतक ठोकलंय.
मुंबई : राजस्थान रॉयल्सचाचा (Rajshthan Royals) स्टार ओपनर जॉस बटलरने (Jos Buttler) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध वादळी खेळी करत खणखणीत शतक ठोकलंय. जॉसने एकूण 66 चेंडूत हे शतक पूर्ण केलं. जॉसच्या आयपीएलच्या कारकिर्दीतील हे दुसरं शतक ठरलं. तसंच बटलर आयपीएलच्या 15 व्या मोसमात शतक ठोकणारा पहिला फलंदाज ठरला. (ipl 2022 mi vs rr rajsthan royals batsman jos buttler scored century against mumbai indians)
मुंबई प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, अनमोलप्रीत सिंह, किरॉन पोलार्ड, टीम डेव्हिड, डॅनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स आणि बासिल थम्पी.
राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हन : जोस बटलर, यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडिक्कल, संजू समॅसन (कॅप्टन/विकेटकीपर), शिमरॉन हेटमायर, रियान पराग, आर अश्विन, नवदीप सैनी, प्रसिद्ध कृष्णा, ट्रेन्ट बोल्ट आणि युजवेंद्र चहल.