मुंबई : आयपीएल 2022 च्या हंगामावर गुजरात टायटन्सने नाव कोरले आहे. यानंतर अनेक दिग्गज खेळाडूंनी आपला  प्लेइंग 11 संघ निवडला. त्याचप्रमाणे क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरनेही आयपीएल 2022 ची प्लेइंग 11 निवडलीय. नेमकी सचिनची प्लेइंग 11 कशी आहे ? आणि कोणत्या खेळाडूला कशी जबाबदारी दिलीय ते पाहूयात.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सचिन तेंडुलकरने IPL 2022 मध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या एकापेक्षा जास्त खेळाडूंची निवड करून त्याची सर्वोत्तम IPL XI तयार केली आहे. या संघाचा कर्णधार म्हणून सचिन तेंडुलकरने अनुभवी भारतीय स्टारची निवड केली आहे.


फलंदाज 
सचिन तेंडुलकरने सलामीच्या जोडीसाठी शिखर धवन आणि जोस बटलरची निवड केली आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी केएल राहुल आणि चौथ्या क्रमांकावर हार्दिक पांड्याची निवड केली आहे. चौथ्या क्रमांकारवर दक्षिण आफ्रिकेचा विस्फोटक फलंदाज डेव्हिड मिलरला निवडले आहे. त्याचबरोबर इंग्लंडचा धोकादायक अष्टपैलू खेळाडू लियाम लिव्हिंगस्टोनला सहाव्या क्रमांकावर संधी देण्यात आली आहे.


बेस्ट फिनिशर
सचिन तेंडुलकरने खतरनाक फिनिशरसाठी दिनेश कार्तिकला ७व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी निवडले आहे. सचिन तेंडुलकरने त्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये विकेटकीपिंगची जबाबदारी दिनेश कार्तिककडे सोपवली आहे.


फिरकीपटू
सचिन तेंडुलकरने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये भारताचा लेगस्पिनर युझवेंद्र चहल आणि अफगाणिस्तानचा घातक लेगस्पिनर राशिद खान यांची निवड केली आहे. तर वेगवान गोलंदाज म्हणून जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीची  निवड केली आहे.


अर्जुनचं काय ?
यंदाच्या आयपीएल हंगामात सचिन तेंडूलकरचा मुलगा अर्जुन तेंडूलकरला आयपीएलमध्ये एकही सामना खेळता आला नाही. मैदानावर अनेकदा तो प्रॅक्टीस करताना दिसला मात्र संघात त्याला जागा मिळाली नाही. अनेकदा त्याला संधी दिली जाईल अशी चर्चा होती.मात्र मुंबईबाहेर होईपर्यत तरी संघात त्याला स्थान मिळाले नाही. तर आता सचिन तेंडूलकरच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये देखील त्याला स्थान मिळाले नाहीए.  


सचिन तेंडूलकरचा संघ 
1. शिखर धवन 2. जोस बटलर 3. केएल राहुल 4. हार्दिक पांड्या (कर्णधार) 5. डेव्हिड मिलर 6. लियाम लिव्हिंगस्टोन 7. दिनेश कार्तिक (डब्ल्यूके) 8. रशीद खान 9. जसप्रीत बुमराह 10. मोहम्मद शमी 11. युजवेंद्र चहल .