मुंबई : येत्या 26 मार्चपासून आयपीएलच्या 15 व्या सिझनला सुरुवात होणार आहे. दरम्यान यापूर्वी बीसीसीआयने एक आदेश जारी केला होता. बोर्डाने टीम इंडियाशी संबंधित असलेल्या 25 खेळाडूंना आयपीएल सुरू होण्यापूर्वी राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीमध्ये 10 दिवसांच्या फिटनेस शिबिरात सहभागी होण्यास सांगितलं होतं. यामध्ये खेळाडूंची फिटनेस तपासण्यात आली. यामध्ये टीम इंडियाचा एक धडाकेबाज खेळाडू यो-यो टेस्टमध्ये अपयशी ठरलाय.


YO-YO टेस्टमध्ये फेल झाला हा खेळाडू


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्थानिक क्रिकेटच्या मुंबई टीमचा कर्णधार आणि दिल्ली कॅपिटल्सचा फलंदाज पृथ्वी शॉ यो-यो टेस्टमध्ये अपयशी झाला आहे. मात्र तरीही तो आयपीएल 2022 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार आहे. गेल्या काही काळापासून पृथ्वी शॉ खराब फॉर्ममध्ये आहे. या कारणामुळे तो टीम इंडियाच्या देखील बाहेर आहे. मात्र यो-यो टेस्टमध्ये नापास होऊनही तो आयपीएलमध्ये खेळू शकतो.


पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, पृथ्वी शॉच्या यो-यो टेस्टचा स्कोर 15 होता. यो-यो टेस्ट पास होण्यासाठी हे पॉईंट्स कमी आहेत. ही टेस्ट पास करण्यासाठी खेळाडूला किमान 16.5 पॉईट्स् मिळणं आवश्यक आहे.


गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने यो-यो टेस्ट पास केली आहे. हार्दिकने फिटनेस टेस्ट देताना गोलंदाजी देखील केली. एनसीएने त्याच्यासाठी गोलंदाजी अनिवार्य केलेली नाही. पण हार्दिकने स्वतः काही ओव्हर टाकल्या. हार्दिकने 135 KMPH वेगाने गोलंदाजी केली, तसंच यो-यो टेस्टमध्ये 17 पेक्षा जास्त पॉईंट्स मिळवले.