Team India मधून ज्याला केलं बाहेर, तोच IPL 2022 मध्ये पर्पल कॅपचा मोठा दावेदार
जो भारतीय खेळाडू गेल्या अनेक दिवसांपासून टीम इंडियातून बाहेर होता, तोच आता IPL 2022 मध्ये पर्पल कॅपचा सर्वात मोठा दावेदार ठरत आहे.
IPL 2022 Purple Cap : इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 15 व्या सीजनला सुरुवात झाली आहे. IPL 2022 ची सुरुवात 26 मार्चपासून सुरु झाली असून आता खेळाडूंच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पहिल्या सामन्यापासूनच कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे. पर्पल कॅपसाठी पहिल्या सामन्यापासूनच स्पर्धा होताना दिसत आहे. (purple cap most wickets in ipl 2022)
ज्या भारतीय खेळाडूला टीम इंडियात गेल्या काही दिवसांपासून संधी मिळाली नाही. तोच खेळाडू या आयपीएल 2022 मध्ये पर्पल कॅपचा सर्वात मोठा दावेदार आहे.
IPL 2022 मध्ये कोणाच्या किती विकेट ?
कुलदीप यादव (DC) - 1 सामना - 3 विकेट
डीजे ब्रावो (CSK) - 1 सामना, 3 विकेट
मोहम्मद शमी (GT) - 1 सामना, 3 विकेट
बासिल थंपी (MI) - 1 सामना, 3 विकेट
एम अश्विन (MI) - 1 सामना, 2 विकेट
भारतीय संघाचा चायनामॅन म्हणून ओळख असलेल्या कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) दिल्ली कॅपिटल्स कडून खेळताना रविवारी मुंबई इंडियन्सच्या ३ फलंदाजांना माघारी पाठवले. रविवारी मुंबई इंडियन्सचे 3 विकेट घेत त्याने दिल्लीच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
कुलदीपने रोहित शर्मा, मनदीप सिंह आणि पोलार्ड यांची विकेट घेतली. भारतीय संघातून खराब कामगिरीमुळे त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती.