IPL 2022 | आयपीएलदरम्यान रवींद्र जाडेजाने तडकाफडकी सोडली चेन्नईची कॅप्टन्सी
Ravindra Jadeja Step Down as Captaincy | क्रिकेट विश्वातून या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. रवींद्र जाडेजाने (Ravindra Jadeja) चेन्नईचं (Chennai Super Kings) कर्णधारपद (Captaincy) सोडलं आहे.
मुंबई : Ravindra Jadeja Step Down as Captaincy | क्रिकेट विश्वातून या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. रवींद्र जाडेजाने (Ravindra Jadeja) चेन्नईचं (Chennai Super Kings) कर्णधारपद (Captaincy) सोडलं आहे. चेन्नई फ्रँचायजीने ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे आता पुन्हा महेंद्रसिंह धोनीकडे (Mahendra Singh Dhoni) नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. (ipl 2022 ravindra jadeja step down as captiancy mahendra dhoni take over charge)
जाडेजाची निराशाजनक कामगिरी
आयपीएलच्या 15 व्या मोसमाच्या सुरुवातीलाच धोनीने चेन्नईच्या नेतृत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर जाडेजाकडे नेतृत्वाची सूत्रं सोपवण्यात आली. मात्र जाडेजाला आपली छाप सोडता आली नाही. जाडेजाने या मोसमातील 8 सामन्यांपैकी 2 सामन्यातच चेन्नईला विजय मिळवून दिला.
जाडेजावर नेतृत्वाची जबाबदारीचा भार असल्याने त्याच्या वैयक्तिक कामगिरीवर परिणाम झाला. त्याला विशेष असं काही करता आलं नाही. त्यामुळे जाडेजाने कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आता पुन्हा धोनी चेन्नईचं नेतृत्व करणार आहे.
कॅप्टन्सी सोडण्यामागे नक्की कारण काय?
रवींद्र जाडेजाने आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच धोनीला नेतृत्व करण्याची विनंती केली. जाडेजाला खेळावर लक्ष देता यावे, यासाठी धोनीने ही विनंतीही स्वीकारली.
धोनीची कर्णधार म्हणून कामगिरी
धोनीने आयपीएलमध्ये सर्वाधिक काळ चेन्नईचं नेतृत्व केलं. तर काही मोसमासाठी पुण्याची कॅप्टन्सी केली. धोनीने आयपीएलच्या इतिहासात एकूण 204 सामन्यांमध्ये नेतृत्व केलंय. यामध्ये त्याने आपल्या कॅप्टन्सीत 121 मॅचेसमध्ये विजय मिळवून दिला. धोनीची विजयी टक्केवारी ही 59.60 टक्के इतकी राहिली आहे.
आयपीएलच्या इतिहासातील यशस्वी कर्णधार
धोनी आयपीएलच्या इतिहासातील रोहित शर्मानंतर दुसरा यशस्वी कर्णधार आहे. धोनीने चेन्नईला एकूण 4 वेळा आयपीएल ट्रॉफी मिळवून दिली आहे. धोनीने चेन्नईला 2010, 2011, 2018 आणि 2021 मध्ये आयपीएलचं विजेतेपद मिळवून दिलं होतं.
अशी आहे चेन्नईची टीम (CSK Team 2022 Players List) :
रवींद्र जडेजा (कॅप्टन), महेंद्र सिंह धोनी, मोईन अली, ऋतुराज गायकवाड, ड्वेन ब्रावो, अंबाती रायडू, केएम आसिफ, तुषार देशपांडे, दीपक चाहर, शिवम दुबे, महेश दीक्षाना, राजवर्धन हंगरकेकर, सिमरजीत सिंह, डेवोन कॉनवे, ड्वेन प्रिटोरियस, मिशेल सेंटनर, एडम मिल्ने, सुभ्रांशु सेनापति, मुकेश चौधरी आणि प्रशांत सोलंकी.