मुंबई :  आयपीएलचा 15 वा मोसम (IPL 2022) हा आता मध्यावर आला आहे. मुंबईचा (Mumbai Indians) अपवाद सोडला तर 9 संघांमध्ये प्लेऑफसाठी चढाओढ पाहायला मिळतेय. या रस्सीखेच दरम्यान 3 खेळाडूंसाठी शनिवारचा दिवस हा फार विशेष ठरला. रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli) आणि महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) या तिकडीसाठी शनिवार खास ठरला. (ipl 2022 rcb virat kohli score fifty mi win match on rohit sharma birthday and mahedra singh dhoni again captain of csk team)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईचा कॅप्टन रोहित शर्माचा शनिवारी 30 एप्रिलला वाढदिवस होता. मुंबईने शनिवारी राजस्थानवर विजय मिळवला. मुंबईचा या मोसमातील हा पहिला विजय ठरला.  मुंबईने या विजयासह रोहितला वाढदिवसाचं गिफ्ट दिलं.


विराटचं कमबॅक


विराट या मोसमात सलग दोन वेळा झिरोवर आऊट झाला. त्यामुळे विराटवर जोरदार टीका करण्यात आली.  विराटने विश्रांती घ्यावी, असा सल्लाही काहींनी दिला. यानंतर विराटने गुजरात विरुद्ध 58 रन्सची खेळी केली. 


धोनी पुन्हा चेन्नईचा कॅप्टन


चेन्नईचा ऑलराऊंडर रवींद्र जाडेजाने शनिवारी चेन्नई सुपर किंग्सची कॅप्टन्सी सोडली. त्यामुळे धोनीकडे पुन्हा एकदा नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली.  जाडेजाच्या नेतृत्वात चेन्नईला 8 पैकी 6 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.