पुणे : आयपीएलच्या (IPL 2022) सामन्यादरम्यान दररोज काही न काही घडत असतंच. आपल्या आवडत्या क्रिकेटरला पाहण्यासाठी अनेक चाहते स्टेडियममध्ये येतात. आवडत्या खेळाडूला आयुष्यात एकदातरी भेटता यावं, अशी चाहत्यांची इच्छा असते. मात्र ही इच्छा पूर्ण होतेच असं नाही. मग अशा वेळेस काही अतिउत्साही चाहते सामन्यादरम्यान सुरक्षा यंत्रणांची नजर चूकवत मैदानात शिरतात आणि आपल्या क्रिकेटरला भेटण्याचा प्रयत्न करतात. (ipl 2022 rcb vs mi talegaon police arrested young man who enitre in ground during to match)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असाच काहीसा प्रकार शनिवारी 9 एप्रिलला झालेल्या सामन्यात पाहायला मिळाला. आरसीबी विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात हा सामना खेळवण्यात आला. या सामन्यादरम्यान रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा एक चाहता मैदानात शिरला. त्याने रोहित शर्मा आणि विराट कोहलीला जवळून पाहिलं. मात्र या तरुणाला आता हे धाडसं महागात पडलंय.


मैदानात घुसलेल्या या अतिउत्साही तरुणाविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे. दशरथ जाधव असं या क्रिकेट चाहत्याचं नाव आहे. 


दरम्यान या सामन्यात बंगळुरुने मुंबईवर 7 विकेट्सने शानदार विजय मिळवला. मुंबईने विजयासाठी दिलेल्या 152 धावांचं आव्हान आरसीबीने 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. मुंबईचा हा या मोसमातील सलग चौथा पराभव ठरला.