रोहित शर्माने विचारलं सारा कुठे आहे, अर्जुन तेंडुलकरनं दिलं असं उत्तर, पाहा VIDEO
मुंबई इंडियन्सने सरावाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओत रोहित शर्मा आणि अर्जुन तेंडुलकर मराठीत एकमेकांशी बोलताना दिसत आहेत.
IPL 2022 : आयपीएलचा (IPL 2022) पंधरावा हंगाम सुरु होण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक राहिलेत. आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) पुन्हा एकदा जेतेपद पटकावण्याची तयारी सुरू केली आहे.
मुंबई इंडियन्सने सहाव्या दिवसाच्या सरावाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) अर्जुन तेंडुलकरसोबत (Arjun Tendulkar) बोलताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये रोहितने आई-वडिल आणि सारा तेंडुलकरबद्दलही विचारलं आहे. ज्याला अर्जुन तेंडुलकरनेही उत्तर दिलं आहे.
अर्जुनसोबत रोहितची खास बातचीत
मुंबई इंडियन्सच्या या व्हिडिओमध्ये कायरॉन पोलार्ड, इशान किशन हे देखील मस्ती करताना दिसत आहेत तर जसप्रीत बुमराहही या व्हिडिओमध्ये सहकऱ्यांची खिल्ली उडवताना दिसत आहे.
व्हिडिओमध्ये अर्जुनची ओळख करून देताना रोहित म्हणतो, 'वन अँड ओनली अर्जुन तेंडुलकर.' त्यानंतर रोहित शर्मा अर्जुनला त्याच्या कुटुंबाबद्दल मराठीत विचारतो. रोहितने सारा तेंडुलकरबद्दलही आस्थेने विचारपूस केली, यावर उत्तर देताना अर्जुन, सारा लंडनमध्ये असल्याचं सांगतो.
मुंबई इंडियन्सची शाही व्यवस्था
मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंसाठी फ्रँचायझीने राहण्याची शाही व्यवस्था केली आहे. मुंबईच्या बीकेसीमध्ये असलेल्या या फाईव्ह स्टार सुविधा असेलल्या जागेला MI Arena असं नाव देण्यात आलं असून हा संपूर्ण परिसर तब्बल 13 हजार स्क्वेअर मीटरमध्ये पसरलेला आहे. मुंबई इंडियन्सचे खेळाडू, त्यांचं कुटुंबीय या संपूर्ण सुविधेचा वापर करू शकतात. MI Arena मध्ये फुटबॉल मैदान, बॉक्स क्रिकेट, फूट व्हॉलीबॉल, मिनी गोल्फ, किड झोन आणि ड्रायव्हिंग रेंज देखील आहे.
27 मार्चपासुन मुंबईचं 'मिशन आयपीएल'
रोहित शर्माच्या नेतृत्वात 27 मार्चपासून मुंबई इंडियन्सचं मिशन आयपीएल सुरुवात होईल. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध मुंबई इंडियन्स सलामीचा सामना खेळणार आहे. या हंगामात मुंबई इंडियन्स, कोलकाता नाइट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स, लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध प्रत्येकी 2 सामने खेळेल. तर सनरायझर्स हैदराबाद रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्सविरुद्ध प्रत्येकी एक सामना खेळणार आहे. मुंबई इंडियन्स साखळीत एकूण 14 सामने खेळणार आहे.
अशी आहे मुंबई इंडियन्सची टीम
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, कायरॉन पोलार्ड, इशान किशन, डेवाल्ड ब्रेविस, बेसिल थंपी, मुरुगन अश्विन, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे, एन तिलक वर्मा, संजय यादव, जोफ्रा आर्चर, डेनियल सेम्स, टायमल मिल्स, टिम डेविड, राइली मेरेडिथ, मोहम्मद अरशद खान, अनमोलप्रीत सिंह, रमनदीप सिंह, राहुल बुद्धि, ऋतिक शौकीन, अर्जुन तेंडुलकर, फेबियन एलेन आणि आर्यन जुयाल