मुंबई :  आयपीएलच्या 15 व्या मोसमातील  (IPL 2022) 68व्या  सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने (yuzvendra chahal) रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे. चहलने हरभजन सिंगला मागे टाकत आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय फिरकीपटू ठरला आहे. (ipl 2022 rr vs csk yuzvendra chahal break harbhajan singh record and become 1st indian spinner who take most wickets in an single season) 


चहलकडून भज्जीचा रेकॉर्ड ब्रेक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चहल अंबाती रायुडूला आऊट करताच तो आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक विकेट्स घेणारा बॉलर ठरला. आयपीएलच्या 15 व्या मोसमातील  रायुडूची विकेट ही चहलची 25 विकेट्स ठरली. 


भज्जीने 2013 मध्ये सर्वाधिक 24 विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. मात्र आता चहलने या मोसमातील 25वी विकेट घेत भज्जीचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. 


चहलने  CSK विरुद्धच्या या सामन्यात 4 ओव्हरमध्ये 6.50 च्या एव्हरेजने 26 रन्स देत 2 विकेट्स घेतल्या. चहलने रायुडू आणि कॅप्टन एमएस धोनीला आऊट केलं. 


या मोसमात चहलने या 2 विकेट्सच्या मदतीने आतापर्यंत 26 विकेट्स घेतल्या आहेत.  तसेच IPLच्या एका मोसमात सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत 2019 मध्ये फिरकी गोलंदाज म्हणून 26 विकेट्स घेणाऱ्या इम्रान ताहिरची बरोबरी केली आहे.


राजस्थान रॉयल्सची प्लेइंग इलेव्हन  : संजू सॅमसन (कॅप्टन-विकेटकीपर), जॉस बटलर, यशस्वी जयसवाल, देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रवीचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, ट्रेन्ट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा आणि ओबेड मॅकॉय. 


चेन्नई सुपर किंग्स : महेद्रंसिंह धोनी (कर्णधार -विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, डेवन कॉनवे, अंबाती रायुडू, एन जगदीशन, मिचेल सॅंटनर, प्रशांत सोलंकी, सिमरजीत सिंह, मतीशा पतिरणा आणि मुकेश चौधरी.