मुंबई : आयपीएलचे सामने 26 मार्चपासून सुरू आहे. पहिला सामना चेन्नई विरुद्ध कोलकाता होत आहे. सर्व टीम आपला पहिला सामना खेळण्यासाठी तयार आहेत. सर्व संघ आयपीएलची तयारी करत आहेत. हैदराबादच्या बॉलरच्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या खेळाडूची गोलंदाजी पाहून इतर टीमच्या कॅप्टनना टेन्शन नक्की येणार आहे. याचं कारण म्हणजे या वेगवान बॉलरनं चक्क स्टंम्प तोडला आहे. वेगवान गोलंदाजानं जो बॉल टाकला तो एवढ्या जोरात आला की स्टंम्पचे दोन तुकडे झाले. हा वेगवान गोलंदाज कोण आहे ज्याने सरावातच स्टंम्प तोडला आहे जाणून घेऊया. 


सनरायझर्स हैदराबादचा पहिला सामना 29 मार्च रोजी होणार आहे. त्यांचा पहिला सामना राजस्थान संघासोबत आहे. या सामन्यासाठी सध्या खेळाडूंची तयारी सुरू आहे. प्रॅक्टिसमध्ये टी नजराजनने एक बॉल असा टाकला ज्यामुळे स्टंम्पचे सरळ दोन तुकडेच झाले. 


टी नटराजनने गेल्या हंगामातही जलवा केला होता. मात्र दुखापतीमुळे त्याला बाहेर पडावं लागलं होतं. आता पुन्हा एकदा टी नटराजन मैदानात यंदा खेळताना दिसणार आहे. त्याचा सरावा दरम्यानचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 


टी नटराजन सराव करताना एक बॉल असा टाकतो ज्यामुळे टक्क स्टंम्पचे मधून दोन तुकडे होतात. हैदराबाद संघाने त्याचा व्हिडीओ ट्वीट केला आहे. नटराजनने आयपीएलच्या करिअरमध्ये 24 सामने खेळून 20 विकेट्स घेतल्या आहेत. 2022 मध्ये हैदराबाद संघाकडून नटराजन कशी गोलंदाजी करतो हे पाहाणं सर्वांसाठी औत्सुक्याचं असणार आहे. 


नजराजनच्या या व्हिडीओमुळे इतर संघातील फलंदाजांचं टेन्शन नक्कीच वाढलं असणार आहे. सोशल मीडियावर त्याचं तुफान कौतुक होत असून हा व्हिडीओ वेगानं व्हायरल होत आहे.