मुंबई : अखेर चाहत्यांची प्रतिक्षा संपली आहे. आजपासून आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला सुरुवात होणार आहे. चेन्नई विरुद्ध कोलकाता पंधराव्या हंगामातील पहिला सामना होणार आहे. आज संध्याकाळी 7 वाजता टॉस होणार आहे. तर 7.30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर चेन्नई विरुद्ध कोलकाता सामना होणार आहे. चेन्नईचं कर्णधारपद रविंद्र जडेजाकडे असणार आहे. आयपीएल सुरु होण्यापूर्वी महेंद्रसिंह धोनीनं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर जडेजाकडे कर्णधारपद सोपवण्यात आलं. 


कोलकाता संघाचं कर्णधारपद श्रेयस अय्यरकडे आहे. गेल्य हंगामात प्लेऑफपर्यंत पोहोचण्यात कोलकाताला यश आलं होतं. आता ट्रॉफीपर्यंत पोहोचण्यासाठी श्रेयस अय्यर कोलकाता संघासाठी काय नव्या स्ट्रॅटजी आखणार पाहावं लागणार आहे. 


काय सांगतात हेड टू हेड रेकॉर्ड


चेन्नई विरुद्ध कोलकाता संघ आजवर 26 वेळा एकमेकांविरुद्ध खेळले आहेत. त्यापैकी 17 सामने चेन्नई संघाने जिंकले आहेत. तर केवळ 8 सामने कोलकाता संघाला जिंकण्यात यश आलं आहे. चेन्नई संघाने 220 सर्वात हाय स्कोअर केला होता. तर कोलकाताने 202 त्यामुळे पहिला सामना आज कोण जिंकणार याकडे सर्वांची नजर असणार आहे. 



चेन्नई सुपरकिंग्स संभाव्य प्लेइंग इलेव्हन


डेवोन कॉन्वे, ऋतुराज गायकवाड़, रॉबिन उथप्पा, अंबाती रायडू, रविंद्र जडेजा (कर्णधार), एमएस धोनी (विकेटकीपर), शिवम दुबे, ड्वेन ब्रावो, मिचेल सँटनर, राजवर्धन हंगरगेकर आणि एडम मिल्ने.


कोलकाता संभाव्य प्लेइंग इलेव्हन


अजिंक्य रहाणे, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, सॅम बिलिंग्स (विकेटकीपर), आंद्रे रसेल, सुनील नारेन, वरुण चक्रवर्ती, टिम साउथी, उमेश यादव आणि शिवम मावी.