उमरानचा बॉलने केला घात, मयंक अग्रवालला मोठी दुखापत, पाहा व्हिडीओ
दुखापतीमुळे कळवळताना दिसला मयंक अग्रवाल, उमरानमुळे मयंकला दुखापत पाहा व्हिडीओ
मुंबई : पंजाब किंग्स विरुद्ध रविवारी झालेल्या सामन्यात वेगवान बॉलर उमरान मलिक पुन्हा एकदा चर्चेत आला. आपल्या फलंदाजीमुळे उमरान खूप प्रसिद्धीझोतात आला. उमरानच्या घातक गोलंदाजीचा मोठा फटका बसला आहे.
उमरानने टाकलेल्या बॉलमध्ये मयंक अग्रवालला दुखापत झाली. मैदानातील या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मयंक अग्रवाल दुखापतीमुळे त्रस्त असल्याचं दिसत आहे.
पंजाबने रविवारी झालेल्या सामन्यात हैदराबादचा 5 विकेट्सने पराभव केला. पंजाब आणि हैदराबाद प्लेऑफच्या रेसमधून आधीच बाहेर निघाले होते. या सामन्यात एक मोठी दुर्घटना होता होता टळली आहे.
या सामन्यात पंजाबच्या 7 व्या ओव्हरमध्ये हैदराबादचा घातक बॉलर उमरानने वेगवान बॉल टाकला तो बॉल मयंक अग्रवालला लागला. दुखापतीमुळे तो कळवळत असल्याचं दिसलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मयंक अग्रवालला दुखापत झाल्यानंतर मॅच काही वेळासाठी थांबवण्यात आली. दुखापतीमुळे मयंक अग्रवाल जास्त खेळू शकला नाही. मोठा शॉट खेळण्याच्या नादात वॉशिंग्टन सुंदरकडून आऊट झाला.