SRH IPL 2023 Auction: आयपीएल (IPL Matches) सामने सुरु होण्यापूर्वी प्रत्येक संघ लिलावामध्ये बोली लावत त्यांच्या परिनं आणि प्राधान्यानं काही खेळाडूंची निवड करतो. यामध्ये खेळाडूसोबतच संघाच्या मालकांचाही मोठा फायदा असतो. अशा या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित आयपीएलच्या लिलावामध्ये हैदराबादच्या (Sunrisers Hyderabad) संघाकडूनही दमदार बोली लावली जाणार आहे. संघासाठी सर्वोत्तम Squad निवडण्यासाठी इथं ही मंडळी प्रयत्नशील दिसत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केन विलियमसन (Kane williamson) आणि निकोलस पूरन (Nicholas Pooran ) या खेळाडूंना रिलीज केल्यामुळं संघाच्या खात्यात 42.2 कोटी रुपये इतकी घसघशीत रक्कम आहे. त्यामुळं ही रक्कम अग्रगणी खेळाडूंना निवडण्यासाठी वापरण्याकडे हैदराबादचा कल दिसत आहे. संघाची मालकी असणाऱ्या काव्या मारन हिनंसुद्धा यासाठीची तयारी दाखवली असून, ती प्रामुख्यानं दोन खेळाडूंसाठी अमाप पैसा ओतणार आहे.


कोणत्या खेळाडूंना संघात घेण्यासाठी हैदराबाद उत्सुक? 


बेन स्टोक्स किंवा कॅमरुन ग्रीन या खेळाडूंकडे सर्वांचंच लक्ष असताना आता या शर्यतीत हैदराबादचाही समावेश झाला आहे. सध्याच्या घडीला एकंदर तयारी पाहता हैदराबादकडून यापैकी किमान एका तरी खेळाडूला हमखास निवडलं जाऊ शकतं. त्यामुळं 23 डिसेंबरला असणाऱ्या या लिलावात नेमकं काय होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. (IPL 2023 Auction Here are 3 players Sunrisers Hyderabad might target in the mini auction Cameron Green and Ben Stokes Cricket News Marathi)


हेसुद्धा वाचा : FIFA World Cup 2022 : अंतिम सामना राहिला बाजूला, फ्रान्समधील 'या' खेळाडूच्या गर्लफ्रेंड्सची यादी संपता संपेना 


दरम्यान, हैदराबादशी संलग्न अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार, 'संघ IPL Auction मध्ये यावेळी अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना निवडेल. ग्रीन, स्टोक्स आणि करन यांसारख्या खेळाडूंना यामध्ये प्राधान्य असेल. पण, या खेळाडूंकडे संपूर्ण आयपीएल स्पर्धेसाठी वेळ आहे की नाही यावरूनच अंतिम निर्णय घेण्यात येईल'. 


सध्या हैदराबादला कुणाची गरज? 


प्रत्येक संघामध्ये काही चांगले गुण आणि काही उणिवा असतात. यातल्या उणिवा भरुन काढण्यासाठी हैदराबादचा संघ सध्या प्राधान्य देताना दिसत आहे. सध्या संघाकडून गोलंदाजीमध्ये चौफेर कामगिरी करणाऱ्या खेळाडूचा शोध आहे. त्यातच निकोलस पूरनच्या जाण्यामुळं संघातील फलंदाजीतही पोकळी निर्माण झाली आहे, त्यामुळं आता येणारा खेळाडू गोलंदाजी आणि फलंदाजीमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारा असावा अशीच इच्छा हैदराबादचा संघ आणि संघाच्या मालकिणीची आहे.