IPL 2023 Auction LIVE :  इंडियन प्रीमीयर लीगचे (IPL 2023) आत्तापर्यंत 15 हंगाम पूर्ण झाले असून आता पुढीलवर्षी 16वा आयपीएल हंगाम खेळवला जाणार आहे. पण त्याआधी उद्या (2  डिसेंबर) आयपीएलच्या या नव्या हंगामासाठी खेळाडूंचा छोटा लिलाव पार पडणार आहे. मात्र या लिलावापूर्वीच एक बातमी समोर येते, ते म्हणजे सनरायझर्स (SRH) हैदराबाद खेळाडूंवर सर्वात जास्त पैसे खर्च करणार आहे. तर RCB आणि KKR सर्वात कमी पैसे खर्च करणार आहेत. तर त्यांच्या व्यतिरिक्त पंजाब किंग्ज, लखनौ सुपर जायंट्स, मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे चार संघ आहेत ज्यांच्या खिशात 20 कोटींहून अधिक रक्कम आहे. दुसरीकडे, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि फाफ डू प्लेसिसचे कोलकाता नाईट रायडर्स (KKR) हे दोन असे संघ आहेत जे लिलावात खूपच कंजूष दिसतील. चला तर मग जाणून घेऊया लिलावात कोणता संघ किती रक्कम घेणार- 


सनरायझर्स हैदराबाद सर्वाधिक पैसे खर्च करणार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएल लिलावात सनरायझर्स हैदराबाद (SRH) खेळाडूंना खरेदी करण्यासाठी सर्वाधिक पैसे खर्च करणार आहे. दरम्यान खेळाडूंना सोडल्यानंतरही सनरायझर्स हैदराबादकडे सर्वाधिक 42.25 कोटी रुपये शिल्लक आहेत. दुसरीकडे, हैदराबादमध्ये सध्या 17 खेळाडूंचे स्लॉट रिक्त आहेत. ज्यामध्ये 13 भारतीय आणि 4 विदेशी खेळाडूंचा समावेश केला जाऊ शकतो. अशा स्थितीत सनरायझर्स मोठी रक्कम देऊन अनेक बड्या खेळाडूंना आपल्या संघात समावेश करू शकतात. 


कोलकाता नाईट रायडर्स कंजूषपणा दाखवतील


इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी लिलावात कोलकाता नाईट रायडर्सचा (kkr) संघ सर्वाधिक कमी खेळताना दिसणार आहे. दरम्यान कोलकाता नाईट रायडर्सकडे सर्वात कमी पैसे आहेत, असे मानले जाते. आयपीएल लिलावासाठी कोलकाता नाईट रायडर्सची किंमत 7.05 कोटी रुपये आहे. कोलकातामध्ये सध्या 14 खेळाडूंची जागा रिक्त आहे. ज्यामध्ये 11 भारतीय आणि 3 विदेशी खेळाडूंचा समावेश केला जाऊ शकतो. 


वाचा : IPL Auction LIVE Updates - कुठे आणि कसा पाहाणार लिलाव? एका क्लिकवर जाणून घ्या सर्वकाही 


तुम्ही थेट लिलाव कुठे पाहू शकता


23 डिसेंबर रोजी कोची येथे होणार्‍या स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि जिओ सिनेमावर चाहत्यांना आयपीएल लिलाव थेट पाहता येणार आहे. आयपीएल लिलावाची अनेक दिवसांपासून चाहते वाट पाहत आहेत. आता थेट प्रक्षेपणाचा तपशील समोर आल्यानंतर चाहत्यांना नक्कीच दिलासा मिळणार आहे. या वेळी केन विल्यमसन, बेन स्टोक्स, जो रूट यांसारखे अनेक स्टार खेळाडू लिलावात बोली लावणार आहेत. अशा परिस्थितीत कोणते खेळाडू कोणत्या संघाचा भाग बनतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.