CSK vs GT IPL 2023 Match: जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग असलेल्या इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलला (IPL 2023) आजपासून सुरुवात होतेय. गतविजेती गुजरात टायटन्स (GT) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यादरम्यानच्या सलामीच्या सामन्याने आयपीएलच्या सोळाव्या हंगामाता सुरुवात होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) संध्याकाळी  7.30 वाजल्यापासून या सामन्याला सुरुवात होईल. स्पर्धेची सरुवात विजयाने करण्यासाठी दोन्ही संघ उत्सुक असून बेस्ट प्लेईंग इलेव्हन (Playing XI) निवडण्याचं आव्हान हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि एमएस धोणीसमोर (MS Dhoni) असणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशी असेल दोन्ही संघांची प्लेईंग XI
गुजरात टायटन्स: शुभमन गिल, ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), केन विलियमसन, मॅथ्यू वेड, हार्दिक पंड्या (कर्णधार), राहुल तेवतिया, राशिद खान, शिवम मावी, जयंत यादव/आर साई किशोर, अल्जारी जोसेफ आणि मोहम्मद शमी.


चेन्नई सुपर किंग्स: ऋतुराज गायकवाड, डेवॉन कॉन्वे, बेन स्टोक्स, मोईन अली, अंबति रायडू, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, महेंद्र सिंह धोनी (कर्णधार, विकेटकीपर), मिचेल सेंटनर, दीपक चाहर आणि सिमरजीत सिंह/तुषार देशपांडे.


कोण असणार इम्पॅक्ट प्लेअर
गुजरातचा संघ Playing XI मध्ये बदलण्याची शक्यात कमीच आहे. इम्पॅक्ट प्लेअरचा वापर करायचा असल्यास साई सुदर्शनला संधी मिळू शकते किंवा मोहम्मद शमीच्या जागी मनोहरला संधी देण्याची शक्यता आहे. दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्ससाठी सामन्याआधी काहीशी चिंतेची बातमी आहे. सराव करताना महेंद्रसिंग धोणी दुखापतग्रस्त झाल्याची माहिती आहे. त्यामुळे तो सामन्यात कर्णधारपद आणि विकेटकिंपिंग जबाबदारी सांभाळेल. पण फलंदाजीसाठी दुसऱ्या खेळाडूला पाठवलं जाईल, अशी सूत्रांनी माहिती दिली आहे.


इम्पॅक्ट प्लेअर म्हणजे काय?
आयपीएल 2023 मध्ये इम्पॅक्ट प्लेअरच्या (Impact Players) नियमामुळे सामना अधिक रंगतदार होणार आहे. संघाच्या कर्णधाराला प्लेइंग इलेव्हनबरोबर पाच सब्सिट्यूट खेळाडूंची नावंही द्यावी लागणार आहे. सामन्यातील 14 षटकं संपण्याआधी पाच सबस्टीट्यूट (Substitute) खेळाडूंपैकी एका खेळाडूला इम्पॅक्ट खेळाडू म्हणून संघात घेता येणार आहेत. सबस्टीटयूट खेळाडू फलंदाजी आणि गोलंदाजीही करु शकणार आहे. पण पावसामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे सामना 10 ओव्हरचा खेळवण्यात आल्यास इम्पॅक्ट प्लेअरचा नियम लागू होणार नाही.


चेन्नई सुपर किंग्स
महेंद्र सिंह धोनी (कर्णधार), डेवॉन कॉन्वे, ऋतुराज गायकवाड़, अंबति रायडू, सुभ्रांशु सेनापति, मोईन अली, शिवम दुबे, राजवर्धन हंगरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सेंटनर, रवींद्र जडेजा, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मथीशा पथिराना, सिमरजीत सिंह, दीपक चाहर, प्रशांत सोलंकी, महेश ठीकशाना, अजिंक्य रहाणे, बेन स्टोक्स, शेख रशीद, निशांत सिंधु, काइल जेमिसन, अजय मंडल आणि भगत वर्मा


गुजरात टायटन्स
हार्दिक पांड्या (कर्णधार), राशिद खान, राहुल तेवतिया, शुभमन गिल, मोहम्मद शमी, शिवम मावी, जोशुआ लिटिल, यश दयाल, डेविड मिलर, आर साई किशोर, अभिनव सदरंगानी, अल्जारी जोसेफ, मॅथ्यू वेड, केन विलियमसन, ऋद्धिमान साहा, जयंत यादव, विजय शंकर, केएस भरत, ओडियन स्मिथ, मोहित शर्मा, नूर अहमद, उर्विल पटेल, प्रदीप सांगवान, दर्शन नालकंडे और साईं सुदर्शन.