Chennai Super Kings vs Rajasthan Royals Playing 11 Prediction : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) च्या 16 व्या हंगामात आज चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ आमने-सामने येणार आहेत. या दोन्ही संघांनी 3-3 सामने खेळले असून दोन सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांच्या आडीच्या फळीतील फलंदाजांची उत्तम राहिली आहे. आजच्या सामन्यात सीएसके आणि आरआरची या दोघांची नजर विजयावर असणार आहे.जाणून घ्या दोन्ही संघांचे आतापर्यंतचे रेकॉर्ड कसे राहिले आणि या सामन्यात कोणाचा वरचष्मा आहे. तसेच संभाव्य प्लेईंन 11 मध्ये कोणत्या कोणत्या खेळाडूचा समावेश असणार आहे ते जाणून घेऊया...


CSK आणि RR संघाचा आतापर्यंतचा रेकॉर्ड 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलच्या 16 व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जला गुजरात टायटन्सकडून 5 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. यानंतर चेन्नई संघाने लखनऊ (LSG) आणि मुंबई इंडियन्सचा (MI) 12 धावा आणि 7 गडी राखून पराभव केला होता. तर राजस्थान रॉयल्सने (RR) पहिल्या सामन्यात सनराइज हैदराबादचा (SRH) 72 धावांनी पराभव केला. तर पंजाबकडून संघाला 5 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. यानंतर संघाने दिल्ली कॅपिटल्सचा 57 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. यानंतर पॉइंट टेबलबद्दल बोलायचे झाले तर, राजस्थान रॉयल्स 2 नंबर तर चेन्नई सुपरकिंग्स पाचव्या स्थानावर आहे.


राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपरकिंग्स हेड टू हेड


आयपीएलच्या इतिहासात राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपरकिंग्समध्ये (RR vs CSK) आतापर्यंत 27 वेळा सामना झाला आहे. यामध्ये चेन्नई सुपर किंग्जने 15 वेळा विजय मिळवला आहे तर राजस्थान रॉयल्सने 12 वेळा सामना जिंकला आहे. तर शेवटच्या सामन्या राजस्थान रॉयल्सने चेन्नईचा 5 विकेट्सने पराभव केला होता. त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यात कोणाचा विजय होणार आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 


खेळपट्टीचा अहवाल


चेन्नईतील एमए चिदंबरम क्रिकेट स्टेडियमच्या मैदानात राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपरकिंग्स यांच्या सामना रंगणार आहे. या सामन्यापूर्वी खेळपट्टीचा अहवाल तपासला असता ही खेळपट्टी फलंदाजांसाठी चांगली असल्याचे दर्शविण्यात आली आहे. यामुळे हे दोन्ही संघाचे लय राखण्याचे लक्ष्य असणार आहे. आतापर्यंतचा खेळपट्टीचा अहवाल पाहता या  भागात संध्याकाळच्या वेळेत दव पडण्याची शक्यता जास्त प्रमाणात वर्तवण्यात येत आहे. अशा परिस्थितीत नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाला या हवामानाचा जास्त फायदा होण्याची शक्यता आहे.  


ही मॅच लाइव्ह कधी आणि कुठे पाहाल?


चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील आयपीएल 2023 सामना आज (12 एप्रिल) चेन्नईच्या एमए चिदंबरम क्रिकेट स्टेडियमवर रंगणार असून हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर केले जाणार आहे. तसेच या सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग 'Jio Cinema' अॅपवर उपलब्ध असून हा सामना मोफत पाहू शकता. 


CSK आणि RR या दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग 11


RR प्लेइंग 11: संजू सॅमसन (कर्णधार आणि विकेटकीपर), जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, रियान पराग, शिमरॉन हेटमेयर, ध्रुव जुरेल, अश्विन, जेसन होल्डर, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, वाई चहल


CSK प्लेइंग 11: मोईन अली, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), शिवम दुबे, ड्वेन प्रिटोरियस, मथिशा पाथिराना, मिचेल सँटनर, सिसांडा मगला, तुषार देशपांडे.