IPL 2023 Final : गुजरात दुसऱ्यांदा की चेन्नई पाचव्यांदा? खिताब जिंकण्यासाठी कशी असेल दोन्ही टीम्सची प्लेईंग 11
CSK vs GT IPL 2023 Final : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज फायनल सामना रंगणार आहे. गुजरात टायटन्स ( Gujarat Titans ) विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज ( Chennai Super Kings ) यांच्यामध्ये हा सामना रंगणार आहे.
CSK vs GT IPL 2023 Final : इंडियन प्रिमीयर लीग 2023 ( IPL 2023 Final ) मधील आज शेवटचा सामना खेळवण्यात येणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स ( Gujarat Titans ) विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज ( Chennai Super Kings ) यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. गतविजेती गुजरात टायटन्स ( Gujarat Titans ) विरूद्ध 4 वेळा आयपीएल जिंकणारी चेन्नई सुपर किंग्ज ( Chennai Super Kings ) यांच्यामध्ये फायनल रंगणार असून हा सामना फार चुरशीचा होणार आहे. फायनलच्या सामन्यात दोन्ही टीमची प्लेईंग 11 कशी असणार आहे. यावर एक नजर टाकूया.
फायनलचा सामना जिंकण्यासाठी चेन्नई ( Chennai Super Kings ) पूर्ण प्रयत्न करणार आहे. यावेळी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni ) प्लेईंग 11 मध्ये बदल करणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान इतक्या महत्त्वाच्या सामन्यात धोनी ( MS Dhoni ) टीममध्ये बदल न करण्याची शक्यता आहे. ज्या टीममुळे तो फायनलमध्ये पोहोचलाय, त्याच टीमसोबत धोनी फायनलच्या सामन्यात मैदानात उतरण्याची शक्यता आहे.
गुजरात टायटन्स करणार का टीममध्ये बदल
एलिमिनेटर 2 च्या सामन्यात गुजरात ( Gujarat Titans ) विरूद्ध मुंबई यांच्यामध्ये लढत झाली होती. या सामन्यात गुजरातचा विजय झाला होता, त्यामुळे हार्दिक पंड्या ( Hardik Pandya ) हीच टीम घेऊन फायनलला उतरण्याची शक्यता आहे. शुभमन गिल आणि जोशुआ लिटल हे इम्पॅक्ट प्लेयर च्या रूपात टीममध्ये असणार आहेत.
चेन्नई सुपर किंग्सचं संभाव्य प्लेईंग - 11 :
ऋतुराज गायकवाड,डेवोन कॉन्वे, शिवम दुबे/मतीशा पथिराना, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), दीपक चाहर, तुषार देशपांडे, महीश तीक्ष्णा
गुजरात टायटन्सचं संभाव्य प्लेइंग - 11 :
शुभमन गिल/जोशुआ लिटिल, वृद्धिमान साहा (विकेटकीपर), साई सुदर्शन, हार्दिक पांड्या (कप्तान), विजय शंकर, डेविड मिलर, राशिद खान, राहुल तेवतिया, नूर अहमद, मोहित शर्मा, मोहम्मद शमी
विजेत्या टीमला किती मिळणार पैसे?
यंदाची आयपीएल जिंकणाऱ्या टीमवर अगदी पैशांचा पाऊस पडणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये एकूण बक्षिसांची रक्कम ही 46.5 कोटी रुपये इतकी आहे. यामध्ये विजेतेपद पटकावणाऱ्या टीमला सर्वाधिक म्हणजे 20 कोटी रुपये, तर उपविजेत्या टीमला 13 कोटी रुपये मिळणार आहेत.
इतकंच नाही तर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असणारी टीम देखील मालामाल होणार आहे. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या मुंबई इंडियन्सला 7 कोटी तर चौथ्या क्रमांकावर असलेल्या लखनऊ सुपरजायंट्सलाही 6.5 कोटी रुपये मिळणार असल्याची माहिती आहे.