GT vs MI Dream11 Predicted Playing XI : आयपीएलच्या (IPL 2023) 16 व्या हंगामातील 35 वा सामना गतविजेत्या गुजरात टायटन्सचा लीगमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सशी (GT vs MI Dream11 Prediction) होणार आहे. हा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज संध्याकाळी 7.30 वाजता होणार आहे. गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांचा सातवा सामना असणार आहे. गुजरात टायटन्सने आतापर्यंत सहा सामने जिंकले आहेत. त्यापैकी चार सामने जिंकले असून गुजरात चौथ्या स्थानावर आहेत. तर मुंबई इंडियन्स संघ सहा सामन्यांत तीन विजयांसह सातव्या क्रमांकावर आहे. आयपीएल (IPL 2023) लीग जसजशी पुढे जाईल तसतसे या टेबलचे गणित अधिक गुंतागुंतीचे होत जाईल. अशा स्थितीत संघांसमोर विजय हाच एकमेव पर्याय आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या सामन्यात वानखेडे स्टेडियमवर (मुंबई) मुंबई इंडियन्सला (GT vs MI) पराभवाचा सामना करावा लागला. रोहितच्या गोलंदाजांनी अखेरच्या पाच षटकांत 96 धावांची अंगलट आली. तर पंजाबने 8 बाद 214 अशी दमदाक मजल मारत मुंबईच्या पदरी अपयश पडले. अशातच आज तर  गुजरात टायटन्ससारख्या फॉर्मात असणाऱ्यां संघाशी टक्कर आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स आज तरी जिंकणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 


खेळपट्टीचा अहवाल


अहमदाबादमधील या हंगामातील तिन्ही सामने गुजरातने जिंकले आहेत. येथे सहा डावांत सर्वात कमी धावसंख्या 177 आहे. चेन्नई सुपर किंग्जसमोरील 178 धावांचे लक्ष्यही गुजरातने सहज गाठले त्यामुळे येथे फलंदाजी करणे सोपे जाईल हे दिसून येते.


असा असेल हवामानाचा अंदाज


हवामानाच्या अंदाजानुसार उन्हाची तीव्र शक्यता वर्तवण्यात आली आहे. सायंकाळनंतरही येथील तापमान 37 अंशांपर्यंत राहण्याची शक्यता आहे. या सामन्यात दव महत्त्वाची भूमिका बजावेल. त्यामुळे नाणेफेकीची भूमिकाही महत्त्वाची असेल. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय संघाला फायदा होऊ शकतो. 


कोणता संघ जिंकणार?


दोन्ही संघ आतापर्यंत फक्त एकदाच आमनेसामने आले आहेत. गेल्या मोसमात हा सामना ब्रेबॉन स्टेडियमवर झाला होता. त्या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 177 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात गुजरातचा संघ केवळ 172 धावाच करू शकला. अखेरच्या षटकात संघाला नऊ धावा करायच्या होत्या. मुंबईने हा सामना पाच धावांनी जिंकला.



दोन्ही संघाची संभाव्य Playing 11


गुजरात टायटन्स : ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पांड्या (क), विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवाटिया, रशीद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद, मोहित शर्मा


मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा (क), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, टिम डेव्हिड, अर्जुन तेंडुलकर, हृतिक शोकीन, जोफ्रा आर्चर, पियुष चावला, रिले मेरेडिथ