Panjab kings beat chennai super kings: आयपीएल 2023 चा 41 व्या सामना आणि आयपीएल इतिहासातील 999 वा सामना आज चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज (CSK vs PBKS) यांच्यात खेळला गेला. चेपॉक स्टेडियमवर (chepauk stadium) खेळला गेलेला हा सामना खऱ्या अर्थाने रोमांचक राहिला. मात्र, या सामन्यात अंपायर्सच्या एका निर्णयावरून मोठा वाद झाल्याचं पहायला मिळतंय. त्याला कारण ठरतंय नवख्या शेख राशीद (Shaik Rasheed) याचा कॅच.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामना थरारक स्थितीत होता. पंजाबला जिंकण्यासाठी 9 बॉलमध्ये 15 धावांची गरज होती. त्यावेळी जितेश शर्मा 9 चेंडूत 21 धावा करत मैदानात पाय रोवून उभा होता. त्यावेळी चेन्नईच्या देशपांडेच्या बॉलवर जितेशने बॉलला आस्मान दाखवलं. त्यावेळी बॉन्ड्रीवर उभा असलेल्या शेख राशीदच्या (Shaik Rasheed Catch) हातात बॉल केला. लांब धावत त्याने कॅच घेतला खरा पण नंतर त्याचा तोल गेला आणि बॉन्ड्रीला त्याचा पाय लागणारच होता. रिव्ह्यू दरम्यान अंपायर्सने आऊट निर्णय दिला. त्याच्या या अफलातून कॅचचं कौतूक झालं पण, अंपायर्सच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.


जितेश शर्मा Out की Not Out?



चेन्नईने दिलेलं 201 धावांचं टार्गेट पूर्ण करताना पंजाबला अखेरच्या षटकात 9 धावांची गरज होती. पथिरनाच्या परफेक्ट बॉलिंगमुळे चेन्नईने सामना आपल्या पारड्यात झुकवला. मात्र, मैदानात होता सिकंदर राझा... अखेरच्या दोन बॉलवर चेन्नईला 5 धावांची गरज होती. राझाने पाचव्या बॉलवर 2 धावा घेतल्या. त्यानंतर आता 1 बॉलवर 3 धावांची गरज. 


पाहा Video



पथिरनासमोर राझाचं आव्हान, तर मागे धोनीचं डोकं. अशातच शेवटच्या बॉलवर राझाने चेंडू बॅकवर्ड स्केवर लेगच्या दिशेने टोलवला. 30 यार्डच्या बाजूला उभ्या असलेल्या फिल्डरच्या वरून बॉल गेल्यावर राझा आणि शाहरूख खानने 3 धावा पूर्ण केल्या अन् चेन्नईवर दणदणीत विजय नोंदवला आहे.