Mumbai Indians Ipl 2023 : आयपीएलचा लिलाव पार पडला आहे. आता आयपीएल (Ipl 2023) सुरु होण्याची उत्सुकता फॅन्सना लागली आहे. त्यात आता मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) फॅन्ससाठी मोठी बातमी समोर आली आहे. यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीची ताकद वाढणार आहे. कारण मुंबईच्या ताफ्यात एक उत्कृष्ट गोलंदाज परतणार आहे. या गोलंदाजाच्या वापसीमुळे मुंबईच्या गोलंदाजीची ताकद वाढणार आहे. याचा फायदा संघाला आगामी हंगामात होणार आहे. 


कोण आहे 'हा' बॉलर ? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) संघाने आयपीएल 2022 च्या मेगा लिलावात इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरला (jofra archer) विकत घेतले होते. मात्र दुखापतीमुळे तो संपूर्ण हंगाम खेळू शकला नव्हता. मात्र आगामी हंगामासाठी जोफ्रा आर्चर पुर्णपणे फिट दिसत आहे. नुकत्याच पार पडलेल्या सामन्यात त्याने उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. या त्याच्या गोलंदाजीमुळे वापसीचे संकेत मिळत आहेत. 


दक्षिण आफ्रिकेविरुद्ध उत्कृष्ट बॉलिंग 


नुकतीच इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची तीन एकदिवसीय मालिका 2-1 ने गमावली होती. पण या वनडे मालिकेत जोफ्रा आर्चरने (jofra archer) अप्रतिम गोलंदाजी केली होती. जोफ्राने मालिकेत तीन सामन्यांमध्ये 7 विकेट घेतल्या होत्या. ज्यामध्ये त्याने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात एकट्याने 6 विकेट घेतल्या आहेत. त्याचा हा परफॉर्मन्स पाहता तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत आहे. तसेच तो पूर्णपणे तंदुरुस्त देखील आहे. आणि आयपीएल 2023 मध्ये खेळण्यासाठी सज्ज आहे. 


आयपीएल कामगिरी


जोफ्रा आर्चरने (jofra archer) आयपीएलमध्ये 35 सामन्यात 46 विकेट घेतल्या आहेत. त्याचा इकोनॉमी 7 च्या आसपास आहे. जोफ्रा आर्चरच्या टी-20 तील आकड्यावर नजर टाकली तर, त्याने 118 डावात 153 विकेट घेतल्या आहेत. 18 धावांत 4 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.


दरम्यान टीम इँडियाचा अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराह (jasprit bumrah) आधीपासूनच मुंबई इंडियन्समध्ये आहे. अशा परिस्थितीत जोफ्रा आर्चर (jofra archer) संघात परतला तर तो त्याचा गोलंदाजीचा पार्टनर बनू शकतो. या दोन्ही खेळाडूंची 8 ओव्हर खेळणे कोणत्याही संघाला सोपे जाणार नाही. हे खेळाडू डावाच्या सुरुवातीलाच भेदक गोलंदाजी करतात. त्यांच्या गोलंदाजीसमोर प्रतिस्पर्धी संघ गुडघे टेकण्याची शक्यता आहे.   


मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक संघ आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईने पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. आता यंदाच्या  हंगामावर कोण नाव कोरतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.