IPL: दोन King एकाच फ्रेममध्ये! Shah Rukh Khan ने लाडाने पकडला Virat Kohli चेहरा अन्...
IPL 2023 KKR vs RCB Shah Rukh Khan: इडन गार्डन्सवर झालेल्या सामना पाहण्यासाठी शाहरुख खानबरोबरच त्याची मुलगी सुहाना आणि केकेआरची सहमालकीण जुही चावलाही उपस्थित होती.
Shah Rukh Khan Virat Kohli Photo: गुरुवारी इडन गार्डन्सच्या मैदानात झालेल्या बंगळुरु रॉयल चॅलेंजर्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्याचा खरा स्टार ठरला शाहरुख खान. केकेआरचा मालक असलेला शाहरुख गुरुवारचा सामना पाहण्यासाठी मैदानात हजर होता. या सामन्यामध्ये केकेआरने आरसीबीला 81 धावांनी पराभूत केलं. या सामन्यानंतरचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये सामन्यानंतर शाहरुखने विराटची भेट घेत अगदी ओंजळीत कोहलीचा चेहरा पकडून प्रेम व्यक्त केलं. त्यानंतर दोघांनीही हसत एकमेकांना मिठी मारली. दोघांनी एकमेकांना कडकडून मारलेली मिठीचा क्षण कॅमेरात टीपला गेला.
फोटो व्हायरल
शाहरुख आणि विराटमधील हा क्षण कॅमेरात टीपला गेला आहे. सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल झाला आङे. पीक ऑफ द डे नावाच्या फॅनपेजवरुन हा फोटो शेअर करण्यात आला आहे. अनेकजण या फोटोमध्ये दोन किंग म्हणजेच किंग कोहली आणि किंग शाहरुख खान एकाच फ्रेममध्ये दिसत असल्याचं म्हटलं आहे. तर काहींना या फोटोत दोघेही दिल्लीचे असल्याचं म्हटलं आहे. हे दोघेही भेटले तेव्हा हिंदी कॉमेंट्रीमध्येही आपआपल्या क्षेत्रात उच्च शिखरावर असणारे दोन आघाडीचे सेलिब्रिटी एकमेकांबद्दल ज्या पद्धतीने प्रेम दाखवत आहेत हे दृष्य चाहत्यांसाठी खरोखरच पर्वणी असल्याचं म्हटलं.
कोण कोण उपस्थित होतं?
शाहरुख खान हा सामना पाहण्यासाठी उपस्थित होता त्यावेळी त्याच्याबरोबर त्याची मुलगी सुहानाही होती. तसेच अभिनेता संजय कपुरची मुलगी आणि सुहानाची मैत्रीण शनाया कपूरही सामना पाहण्यासाठी आली होती. शाहरुखने काळ्या रंगाचं हुडी आणि काळी जिन्स परिधान केली होती. कॅमेरा शाहरुखवर आल्यानंतर चाहत्यांनी एकच जल्लोष केला त्यावेळी शाहरुखनेही हात दाखवून चाहत्यांना प्रतिसाद दिला. तसेच मैदानावर झुमे जो पठाण हे पठाण चित्रपटामधील गाणं वाजलं असता शाहरुख सामना पाहण्यासाठी उपस्थित असलेल्या झुमे जो पठाणवर गाण्यावर थिरकताना दिसला. यावेळेस शाहरुखबरोबर त्याची मॅनेजर पुजा दादलानी आणि ज्येष्ठ गायिका उषा उत्थुपही उपस्थित होत्या.
असेच आम्ही जिंकत राहो
केकेआरची सहमालकीण असलेली अभिनेत्री जुही चावलाही या कार्यक्रमाला उपस्थित होती. सामन्यानंतर एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना जुहीने, "आमच्या संघाने केलेल्या कामगिरीमुळे मी समाधानी आहे. आमच्या सर्व सामन्यांचा असाच निकाल लागो अशी माझी इच्छा आहे. आज मैदानातील प्रत्येक सीट भरलेली होती. असाच पाठिंबा आम्हाला मिळो आणि आम्ही अंतिम सामन्यापर्यंत पोहचून जेतेपद मिळवावे," असं म्हटलं.